Mumbai : जो पुरस्कार मिळवण्याचे स्वप्न बघितले तोच पुरस्कार देणारे हात झाले

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या हस्ते समाजातील ४४ महिलांचा गौरव

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : क्षेत्र कोणतेही असो सातत्याने परिश्रम घेतले की एक दिवस यश मिळतेच. जेव्हा स्त्री घराबाहेर पडत असते तेव्हा कुटुंबासह समाजानेही तिच्या पाठिशी उभे रहायला हवे. अशी साथ मिळाल्यास प्रत्येक स्त्री ही कुटुंबासह समाजासाठी सतत लढत असते, असे सांगत महापौर रितू तावडे पुरस्कार्थी महिलांची पाठ थोपटत आपल्याही आठवणींना उजाळा देत, आपल्या समाजकार्याची सुरुवात बचत गटापासून झाल्याचे सांगितले. तेव्हा मलाही वाटले होते की, आपल्याला हा पुरस्कार मिळावा. आज त्याच पुरस्काराचे वाटप करण्याची संधी मला मिळाली आहे. बचत गटापासून सुरू झालेला हा प्रवास मुंबईच्या प्रथम नागरिक महापौर पदापर्यंत पोहोचला. या प्रवासात कुटुंबाचा, समाजाचाही तितकाच मोठा वाटा असल्याचे रितू तावडे यांनी आवर्जुन सांगितले. निमित्त होते महापालिकेच्यावतीने ४४ महिलांच्या सन्मान सोहळ्याचे.


जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महानगरपालिकेच्या नियोजन विभागाकडून विविध क्षेत्रातील ४४ कर्तृत्ववान महिलांचा मंगळवारी ३१ मार्च २०२६ रोजी सन्मान करण्यात आला. भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील पेंग्विन सभागृहात हा सन्मान सोहळा पार पडला. उपमहापौर संजय घाडी, महिला बालकल्याण समितीच्या अध्यक्षा मीनल तुर्डे, ए, बी आणि ई प्रभाग समिती अध्यक्ष ज्ञानराज निकम, स्थापत्य समिती (शहर) अध्यक्षा यामिनी जाधव, स्थापत्य समिती (उपनगरे) अध्यक्षा संगीता शर्मा, विधी समितीच्या अध्यक्षा दीक्षा कारकर, महिला बालकल्याण समितीच्या उपाध्यक्षा रिटा मकवाना, आर मध्य आणि आर उत्तर प्रभाग समितीचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, सी आणि डी प्रभाग समिती अध्यक्ष आकाश पुरोहित, महानगरपालिकेचे विविध नगरसेवक, नगरसेविका तसेच संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर, महानगरपालिका सचिव मंजिरी देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी बोलतांना महापौर रितू तावडे यांनी , सामाजिक, राजकीय, वैद्यकीय, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक यासह विविध क्षेत्रात महिलांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या महिलांच्या पाठीशी मुंबई महानगरपालिका सतत उभी असते. सक्षमीकरणाची उंची गाठलेली स्त्री आता अबला नसून सबला झाली आहे, अशा शब्दात मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी स्रीशक्तीचा सन्मान केला. समाजातील सर्व घटकातील महिलांची वाटचाल सुसह्य व्हावी, यासाठी महानगरपालिका नेहमी प्रयत्नशील राहील, असेही नमूद केले.


उप महापौर संजय घाडी यांनी याप्रसंगी बोलतांना, समाजातील प्रत्येक क्षेत्रात महिलांचे योगदान आहे. समाजविकासासाठी योगदान देणाऱ्या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका विविध योजनांच्या माध्यमातून सतत प्रयत्नशील असते. नियोजन विभागाने बचत गटाच्या माध्यमातून सुरू केलेल्या माहिम सी फूड प्लाझाचे कौतूक केले. सी फूड प्लाझामुळे कोकणी खाद्य संस्कृती जोपासली जात असून, पर्यटनातही वाढ होत असल्याचे सांगितले. तर महिला बालकल्याण समितीच्या अध्यक्षा मीनल तुर्डे म्हणाल्या, महिलांच्या कार्याचा गौरव केला तर त्यांना अशा कार्यक्रमातून प्रेरणा मिळत असते. ज्या समाजात स्त्रीयांचा सन्मान होतो तोच समाज पुढे जातो, असेही त्या म्हणाल्या.


प्रास्ताविक संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर यांनी केले. यावेळी बोलतांना त्यांनी महानगरपालिकेने विविध बँकांच्या माध्यमातून अर्थसहाय्य केलेले आठ हजारांपेक्षा अधिक बचत गट मुंबई कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. आणि या प्रत्येक गटाने विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. तसेच बचत गट आता पारंपरिक व्यवसायांसोबतच ऑनलाइन व्यवसायातही उतरल्याचे त्यांनी सांगत त्यांचे कौतुक केले.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने