Kharat Case : अशोक खरातच्या मुलगा एसआयटीच्या ताब्यात!

नाशिक  : अशोक खरात याने महिलांवर केलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास सध्या पोलीस आणि एसआयटीमार्फत सुरू आहे. महिलांचे शोषण करण्याबरोबरच खरातने पैसेही उकळल्याचे समोर आले आहे. याच प्रकरणात त्याची पत्नी कल्पना खरातवर गुन्हा दाखल झाला आहे. खरातच्या पत्नीला अटक करण्यासाठी पथक आले होते, मात्र ती फरार झाली आहे. दरम्यान, पथकाने खरातच्या मुलाला ताब्यात घेतले आहे. अशोक खरातची पत्नी कल्पना खरात हिच्यासह पाच जणांविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे कल्पना खरातही या प्रकरणात आरोपी बनली आहे. कल्पना खरातला अटक करण्यासाठी मंगळवारी सायंकाळी एसआयटी पथक खरातच्या घरी पोहोचले. पण, कल्पना खरात फरार झाल्याचे समोर आले. त्यानंतर पथकाने अशोक खरात यांच्या मुलाला ताब्यात घेतले. पथक अशोक खरातच्या मुलाला घेऊन गेले आहे. या संपूर्ण प्रकरणात त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. शिर्डीतील रावसाहेब गोंदकर यांनी अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना खरात आणि इतर तिघे अशा पाच जणांविरोधात जमीन बळजबरी खरेदी केल्याची आणि कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली होती.


खरातचे कोरेगाव पार्कमध्ये कोट्यवधींचे व्यवहार


भोंदू खरात प्रकरणाचा तपास पुढे सरकत असताना त्याचे धागेदोरे कोरेगाव पार्कपर्यंत पोहोचल्याचे समोर आले आहे. एसआयटीच्या तपासात खरातचा निकटवर्तीय सीए प्रकाश पोफळे याच्याकडून २०२४ मध्ये कोट्यवधींची मालमत्ता खरेदी झाल्याचे उघड झाले. माहितीनुसार, कोरेगाव पार्कमध्ये ८ रो-हाऊस आणि सुमारे ४९ गुंठे जागा खरेदी करण्यात आली असून, कागदोपत्री किंमत १९.५६ कोटी रुपये दाखवली आहे. मात्र, बाजारभावानुसार ही किंमत १०० कोटींपेक्षा जास्त असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे काळा पैसा वापरल्याची शक्यता तपासात आहे. मंत्रतंत्राच्या नावाखाली गोळा केलेला पैसा ट्रस्ट, बेनामी व्यवहार आणि मालमत्ता खरेदीतून पांढरा करण्यात आला का, यावर तपास केंद्रित आहे. काही व्यवहारांमध्ये संशयास्पद पद्धतींचा वापर झाल्याचेही समोर आले आहे. एसआयटीकडून बँक व्यवहार, मालमत्ता नोंदी आणि संबंधितांच्या भूमिकेचा सखोल तपास सुरू असून, या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Nashik : नाशिकला जागतिक स्तरावर नेण्याची तयारी ! ‘५० यस सिटीज्’ उपक्रमासाठी महापालिका प्रस्ताव देणार, सिंगापूरसोबतही करणार करार

Nashik : कुंभनगरी नाशिकच्या विकासाला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देण्यासाठी नाशिक महानगरपालिकेने महत्त्वपूर्ण

BMC News : पाच वर्षांतच गारोडिया नगरमधील पाच रस्त्यांचा पुन्हा विकास; तब्बल साडेचार कोटी रुपये केले जाणार खर्च

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : पूर्व उपनगरातील घाटकोपर (पूर्व) मधील गारोडिया नगर वसाहतील खासगी रस्त्यांचा विकास पाच

रशियन तेल खरेदीवर भारताला टॅरिफमधून सूट, ट्रम्प यांचा मोठा निर्णय, भारतासह 'या' पाच देशांना दिलासा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून तेल आणि वायू खरेदी करणाऱ्या भारतासह पाच देशांना

BMC : महापालिका तथा ग्रीन बाँड्सच्या हालचाली जोरात; बाँड्स जारी करण्यासाठी सल्लागार नियुक्तीकरता महापालिकेची निविदा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महानगरपालिका ग्रीन बाँडस् सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, क्षार निर्मूलन प्रकल्प

School Bus Fire : उन्नावमध्ये शालेय बसला भीषण आग! 60 विद्यार्थी थोडक्यात बचावले; महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

उन्नाव : उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे लखनौ-कानपूर महामार्गावर शुक्रवारी संध्याकाळी शालेय विद्यार्थ्यांना घेऊन

Tesla Roadster : हवेत उडणारी कार खरंच बाजारात येणार ? टेस्लाची नवी Roadster चर्चेत, पण...

Tesla Roadster : जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्लाची (Tesla) नवी रोडस्टर कार सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या