Corporator Tejinder Singh Tiwana : जनसेवेचा आदर्श! नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांचा मोठा निर्णय

- ५ वर्षांचे संपूर्ण वेतन महापौर निधीसाठी


मुंबई : जनहितासाठी एक प्रेरणादायी पाऊल उचलत नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांनी आपल्या संपूर्ण वेतन आणि भत्ते जनसेवेसाठी समर्पित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात आणि सर्वसामान्यांमध्ये कौतुकाची लाट उसळली आहे.


नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत वॉर्ड ४७ मधून विजयी झालेल्या तिवाना यांनी आपल्या पुढील पाच वर्षांच्या कार्यकाळातील संपूर्ण मानधन तसेच विविध समिती बैठकींसाठी मिळणारे सर्व भत्ते महापौर निधी मध्ये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी महापौरांकडे अधिकृत निवेदनही सादर केले आहे.


यावेळी बोलताना तिवाना म्हणाले, “नगरसेवक म्हणजे केवळ पद नाही, तर ती जबाबदारी आहे. जनतेची सेवा निस्वार्थ भावनेने व्हायला हवी. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहोचवणे हेच माझे पहिले कर्तव्य आहे. याच भावनेतून मी माझे संपूर्ण वेतन आणि भत्ते जनकल्याणासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.”


तिवाना यांनी व्यक्त केलेला विश्वास असा की, ही रक्कम गरजू मुंबईकरांच्या मदतीसाठी आणि विविध जनकल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वाची ठरेल.


दरम्यान, भारतीय जनता पक्ष यंदाच्या महापालिका निवडणुकांमध्ये युवा उमेदवारांना संधी देत नव्या विचारसरणीला चालना देण्याचा प्रयत्न करत आहे. मुंबईच्या विकासाला नवी दिशा देण्याच्या दृष्टीने तिवाना यांचा हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.


एकूणच, तेजिंदर सिंग तिवाना यांची ही पुढाकार केवळ त्यांच्या जनसेवेतील निष्ठेचे प्रतीक नसून, इतर जनप्रतिनिधींनाही प्रेरणा देणारे उदाहरण ठरत आहे.

Comments
Add Comment

Eknath Shinde : आम्ही दुसऱ्या पक्षात गेलो नाही, आम्ही शिवसेनेतच आहोत; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उबठा गटावर घणाघात

दिल्ली : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच शिवसेना उबाठा

Dadaji Bhuse : शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी ‘चला शाळेत जाऊया’ अभियान; मंत्री दादाजी भुसे यांची घोषणा

शालेय शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी शाळांमध्ये काढणार चार दिवसांचा दौरा मुंबई : राज्यातील शाळांमधील मूलभूत

Shiv Sena party constitution : २०१८ च्या पक्षघटनेने शिवसेनेतील अधिकार एका व्यक्तीकडे केंद्रीत केले; सर्वोच्च न्यायालयात नीरज किशन कौल यांचा युक्तिवाद

४३ मान्यताप्राप्त पक्षांपैकी ४२ पक्षांत संघटनात्मक निवडणुका शिवसेना होती एकमेव अपवाद होती निवडणूक आयोगाच्या

jaykumar gore : ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत बैठक; मागण्या मार्गी लावण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याची भूमिका

मुंबई : ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामसेवकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात आज बैठक घेऊन संबंधित मागण्यांचा

Mangal Prabhat Lodha : इस्रायलमध्ये रोजगारासाठी महाराष्ट्रातील ६० बांधकाम कामगारांची पहिली तुकडी होणार रवाना

• कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांचा इस्रायलमध्ये रोजगारासाठी जाणाऱ्या युवकांशी संवाद मुंबई :

Mangal Prabhat Lodha : शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी एक महापालिका शाळा दत्तक घेऊन त्यांच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे; मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई : शिक्षण क्षेत्रातील नामांकित संस्था, शाळा आणि शिक्षणतज्ज्ञांनी आपल्या परिसरातील किमान एका महापालिका