Dadar-Bhusaval Express : खान्देशी प्रवाशांसाठी आनंदवार्ता! दादर–भुसावळ एक्स्प्रेस आता कायमस्वरूपी धावणार

मुंबई : जळगावसह खान्देशातील रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून विशेष गाडी म्हणून धावणारी दादर–भुसावळ एक्सप्रेस (Dadar-Bhusaval Express) आता कायमस्वरूपी करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ही गाडी आता नव्या १९०४७/४८ या क्रमांकाने नियमितपणे धावणार आहे. खासदार स्मिता वाघ यांनी याबाबत माहिती दिली.



तिकिट दरात तब्बल २० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात :


विशेष गाडी (Dadar-Bhusaval Express) असल्यामुळे प्रवाशांना आतापर्यंत अतिरिक्त भाडे मोजावे लागत होते. मात्र, आता नियमित गाडीचा दर्जा मिळाल्यामुळे तिकिट दरात तब्बल २० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात होण्याची शक्यता व्यक्त होत असून सामान्य प्रवाशांचा आर्थिक भार कमी होऊ शकतो. प्राप्त माहितीनुसार, या गाडीला प्रवाशांचा सातत्याने चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळेच तिला कायमस्वरूपी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवासी संख्या, मागणी आणि सोयी सुविधांचा विचार करून हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.


जळगावच्या खासदार स्मिता वाघ यांनीही या निर्णयाचे स्वागत करत खान्देशातील नागरिकांच्या दीर्घकाळापासून असलेल्या मागणीला न्याय मिळाल्याने समाधान व्यक्त केले आहे. या सुविधेमुळे प्रवास अधिक सुलभ, किफायतशीर आणि सुरक्षित होईल.


पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून तूर्त (Dadar-Bhusaval Express) दादर–भुसावळ (०९०४९) आणि भुसावळ-दादर (०९०५०) दरम्यान आठवड्यातून एक दिवस दर शुक्रवारी धावणाऱ्या साप्ताहिक विशेष गाडीचा कालावधी तीन एप्रिलपासून ३१ जुलै २०२६ पर्यंत वाढविण्यात आला आहे. याशिवाय, दादर-भुसावळ (०९०५१) आणि भुसावळ–दादर (०९०५२) दरम्यान आठवड्यातून तीन दिवस सोमवार, बुधवार आणि शनिवारी धावणाऱ्या त्रिसाप्ताहिक विशेष रेल्वे गाड्यांचा कालावधी २९ जुलै २०२६ पर्यंत वाढविण्यात आला आहे.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी