RTE अंतर्गत आले दोन लाख ८८ हजार अर्ज

मुंबई : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी राज्यातील दोन लाख ८८ हजारांहून अधिक बालकांचे अर्ज आले आहेत. या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.


प्रवेशासाठी ऑनलाइन सोडत आणि प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल, असेही शिक्षण विभागाने नमूद केले आहे. प्राथमिक शिक्षण विभागातर्फे खासगी शाळांमधील आरटीई २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी केंद्रीय पद्धतीने ऑनलाइन प्रक्रिया राबविली जाते.


यंदा राज्यातील आठ हजार ७०१ शाळांमध्ये एक लाख १४ हजार ८३३ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. आरटीई प्रवेशासाठी विद्यार्थ्याच्या निवासस्थानापासून एक किलोमीटर परिसरातील शाळा निवडण्याचे शिक्षण विभागाने घातलेले बंधन उच्च न्यायालयाने रद्द केले. त्यानंतर शिक्षण विभागाने एक किलोमीटरची मर्यादा काढून अर्ज भरण्यासाठी पालकांना संधी उपलब्ध करून दिली होती. त्यानुसार अर्ज भरण्यासाठी २५ मार्चपर्यंत मुदत दिली होती. मात्र, त्याला पुन्हा मंगळवारपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. या मुदतीपर्यंत दोन लाख ८८ हजारांहून अधिक बालकांच्या प्रवेशासाठी अर्ज करण्यात आले आहेत. गेल्या वर्षी या प्रवेशासाठी जवळपास तीन लाखांहून अधिक अर्ज आले होते. यंदा अर्जांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने