Navsari : नवसारी येथे असलेल्या उभारणार भव्य क्रीडा संकुल

मुंबई : अमरावती शहरातील क्रीडाप्रेमींसाठी आनंदाची बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अमरावतीलगतच्या नवसारी येथे १६,७०८ चौ. मी. जागा क्रीडा संकुलासाठी अमरावती महानगरपालिकेला विनामूल्य देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. महसूलमंत्री व अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने हा निर्णय घेतला.


या जागेवर विकास योजनेअंतर्गत 'खेळाचे मैदान' असे आरक्षण होते आणि त्याचा आगाऊ ताबा महापालिकेला देण्यात आला होता. मात्र, महापालिकेने या जागेवर पूर्वपरवानगीशिवाय त्रयस्थांसोबत करार करून क्रीडा संकुल विकसित केले आणि काही क्षेत्रावर (१८७८.८० चौ.मी.) वाणिज्य वापर सुरू केला होता. या शर्तभंगामुळे शासनाच्या नियमांनुसार या जागेचे अकृषिक दराने होणारे मूल्यांकन १० कोटी ९० लाख १९ हजार ७०० रुपये आणि २०११ पासूनच्या वाणिज्य वापरापोटीचे व्याज ३ कोटी ५६ लाख २१ हजार ८६२ रुपये, अशी एकूण १४ कोटी ४६ लाख ४१ हजार ५६२ रुपयांची रक्कम शासनाकडे जमा करण्याचे आदेश देण्यात आले होते.


परंतु, अमरावती महानगरपालिकेची सध्याची आर्थिक स्थिती बेताची असून, कर्मचाऱ्यांची देणी व कंत्राटदारांची थकीत देयके असे जवळपास ३५० कोटींचे दायित्व महापालिकेवर आहे. महापालिकेच्या स्वउत्पन्नातून एवढी मोठी रक्कम भरणे शक्य नसल्याचे महापालिका आयुक्तांनी शासनाला कळवले होते. याबाबत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील पाठपुरावा करुन पालिकेसाठी हे मैदान उपलब्ध करुन देण्याचा मार्ग मोकळा करून दिला.


* नवसारी (जि. अमरावती) येथील सर्व्हे नं. २९ मधील १६,७०८ चौ.मी. जागा आता क्रीडा संकुलासाठी महापालिकेला विनामूल्य हस्तांतरित केली जाईल.
* वाणिज्य वापरामुळे आकारण्यात आलेले ३ कोटी ५६ लाख रुपयांचे व्याज पूर्णपणे माफ करण्यात आले आहे.
* सदर आरक्षणास नगर विकास विभागाची मान्यता प्राप्त होण्याच्या अधीन राहून ही जागा महापालिकेला प्रदान करण्यात येईल.
शासनाच्या या सकारात्मक निर्णयामुळे अमरावती महानगरपालिकेवरील मोठा आर्थिक भार हलका झाला असून, शहरातील खेळाडूंसाठी हक्काचे 'क्रीडा संकुल' उभे राहण्यास मोठी मदत मिळणार आहे.


.............


अमरावती शहरासाठी क्रीडांगण ही आवश्यक बाब होती. या ठिकाणी तयार झालेले अनेक खेळाडू देश आणि जगभरात लौकिक मिळवत आहेत. त्यामुळे सामाजिक हित आणि खेळाडूंची गरज लक्षात घेऊन या क्रीडांगणासाठी शासकीय जागा महापालिकेस विनामूल्य देण्यात येत आहे. : चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री व पालकमंत्री, अमरावती

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने