IT Layoffs : आयटी क्षेत्राचा ‘ब्लॅक वेन्सडे’: तब्बल ३० हजार कर्मचाऱ्यांना एका झटक्यात कंपनीकडून मिळालं नारळ!

- सुमारे १२ हजार भारतीय कर्मचाऱ्यांची नोकरी गेली



मुंबई : सकाळची शिफ्ट सुरू होण्याआधीच आलेल्या एका ई-मेलने आयटी क्षेत्रात खळबळ उडवली. काहींची शिफ्ट सुरू झाली होती, तर काही कामावर जाण्याच्या तयारीत होते आणि तेवढ्यातच इनबॉक्समध्ये आलेल्या ई मेलने हजारो कर्मचाऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.


सुरुवातीला अनेकांना हा एप्रिल फूलचा विनोद वाटला. पण काही मिनिटांत फोन, मेसेजेस सुरू झाले आणि वास्तव समोर आलं. हा खरोखरच layoff चा मेल होता. जागतिक आयटी कंपनी ओरॅकल कॉर्पोरेशन (Oracle Corporation) ने एकाच झटक्यात जगभरातील तब्बल ३० हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं. कंपनीच्या एकूण स्टाफपैकी सुमारे १८% कपात करण्यात आली आहे.


यातील सर्वाधिक फटका भारताला बसला असून, सुमारे १२ हजार भारतीय कर्मचाऱ्यांची नोकरी गेली आहे. त्यामुळे आयटी क्षेत्रासाठी आजची सकाळ ‘ब्लॅक वेन्सडे’ ठरली आहे.



पहाटे ५-६ वाजता आला धक्कादायक मेल :


कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पहाटे ५ ते ६ च्या दरम्यान कंपनीकडून मेल आला. त्या मेलमध्ये थेट सांगण्यात आलं की तुमची भूमिका आता redundant (अनावश्यक) झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, काही कर्मचाऱ्यांनी १५-२० वर्षे कंपनीत काम केलं होतं, तरीही कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आहे. मेल वाचताच अनेकांचे लॅपटॉप आणि सिस्टम ऍक्सेस देखील तात्काळ बंद करण्यात आले.



भारतामध्ये मोठी कपात :


भारतामध्ये ओरॅकल कॉर्पोरेशन या कंपनीचे जवळपास ३० हजार कर्मचारी होते, त्यापैकी ४०% म्हणजेच १२ हजार लोकांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. सोशल प्लॅटफॉर्म्सवर कर्मचाऱ्यांनी सांगितलं की; काही टीम्समध्ये ५०% पेक्षा जास्त कपात करण्यात आली, तर एका मॅनेजरच्या २० जणांच्या टीमपैकी ६ जणांना एकाच वेळी मेल आला.


याआधी Amazon सारख्या कंपन्यांनीही अशाच प्रकारचे कर्मचारी कपात केली होती. या सगळ्या प्रकारामुळे आयटी क्षेत्रात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.


नवीन नोकऱ्या कमी मिळत असताना, आधीच कामावर असलेल्यांनाही अचानक बाहेर पडावं लागत असल्याने कर्मचारी चिंतेत आहेत. एकंदरीत, AI चा वाढता वापर आणि कंपन्यांचे बदलते धोरण यामुळे आयटी क्षेत्रात मोठे बदल होण्याची चिन्हं दिसत आहेत.

Comments
Add Comment

Nashik Crime : नराधमाला फाशीच ! डोंगराळे बालिका अत्याचार व हत्या प्रकरणात विजय खैरनारला फाशीची शिक्षा, जलदगती न्यायालयाचा मोठा निकाल

Nashik Crime : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील साडेचार वर्षांच्या बालिकेवरील लैंगिक अत्याचार आणि

Mobile New Rules: Truecaller शिवाय कळणार अनोळखी कॉल कोणाचा! 1 नोव्हेंबरपासून मोबाईलवर दिसणार कॉल करणाऱ्याचं नाव

Mobile New Rules: मोबाईलवर अनोळखी नंबरवरून कॉल आल्यास तो नेमका कोणाचा आहे, हे जाणून घेण्यासाठी अनेकजण Truecaller सारख्या अ‍ॅपचा

Jio Platforms IPO : रिलायन्सचा मोठा निर्णय; Jio IPO प्राईस बँड जाहीर, भागधारकांना विशेष लाभ!

Jio Platforms IPO: मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजची डिजिटल आणि टेलिकॉम कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्सचा

प्रेमासाठी काय पण ! 75 वर्षीय रामसुगर 30 वर्षांच्या रानी राजपूतशी बांधणार लग्नगाठ, साखपुड्याचा व्हिडीओ व्हायरल

उत्तर प्रदेश : प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं म्हटलं जातं. उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील एका अनोख्या

Cotton Rate : कापसाच्या दरात तेजीचे संकेत ! भाव 10 हजारांचा टप्पा ओलांडणार? शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या

Cotton Rate : राज्यात यंदा कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एल निनोचा प्रभाव, पावसातील मोठे

Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी नाशिक पोलिसांची तयारी, गोदाकाठावर रंगीत तालीम

Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे ३१ ऑक्टोबर रोजी ध्वजारोहण सोहळा पार