Ashok Kharat Case : भोंदू बाबा अशोक खरातची केस लढवण्यास सरकारी वकिलाचा नकार

मुंबई : भोंदू बाबा खरात प्रकरणात सरकारी वकील म्हणून कार्य करणारे अजय मिसर यांनी वाढत्या कामाच्या ताणामुळे खरात यांचा खटला लढविण्यास नकार दिला आहे. त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणात मिसर यांनी अशी भूमिका का घेतली याबाबत उलट सुलट चर्चा सुरू असून त्यांच्यावर कोणाचा दबाव होता का अशी चर्चा सध्या नाशिकच्या प्रशासकीय आणि न्यायालयीन वर्तुळात सुरू आहे.


महाराष्ट्राला हादरवणाऱ्या आणि अनेक बड्या राजकारण्यांना घाम फोडणाऱ्या भोंदूबाबा अशोक प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. सरकारी वकील अजय मिसर यांनी अशोक खरातविरोधात एसआयटीची केस लढण्यास असमर्थता दाखवली आहे. एसआयटीने विशेष सरकारी वकील अजय मिसर यांना ही केस चालवण्यासाठी लेखी पत्राद्वारे विनंती केली होती. मात्र सरकारी वकील अॅड. अजय मिसर यांनी केस चालवण्यास नकार दिला आहे.


२०११ मुंबई साखळी बॉम्ब स्फोट खटला, रवी पुजारी प्रकरणातील महाराष्ट्रातील सर्व खटले तसेच अन्य महत्वाच्या खटल्याच्या न्यायालयीन चौकशीच्या कामामुळे या प्रकरणाला वेळ व न्याय देता येणार नसल्याने विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी केस चालवण्यास नकार दिल्याची माहिती समोर येत आहे. अजय मिसर यांनी नकार दिल्याने सहाय्यक सरकारी वकील शैलेंद्र बागडे हेच युक्तिवाद करणार आहेत.


दरम्यान, शिर्डी येथील गुन्ह्याच्या तपासात अशोक खरात यांची पत्नी कल्पना खरात हिला चौकशीसाठी एसआयटी बोलविण्याच्या तयारीत असताना ती फरार झाली. अशोक खरातची पत्नी कल्पना खरात हिच्यासह पाच जणांविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कल्पना खरातला अटक करण्यासाठी एसआयटी पथक खरातच्या घरी पोहोचले. पण, कल्पना खरात फरार झाल्याने पथकाने अशोक खरात याच्या मुलाला ताब्यात घेतले आहे.

Comments
Add Comment

पुण्यात भरधाव कारचा थरार! एमआयटी कॉलेज रोडवर 3 ते 4 दुचाकींना धडक; 24 वर्षीय चालक पोलिसांच्या ताब्यात

पुणे : पुण्यातील कोथरूड परिसरात भरधाव कारने अनेक दुचाकींना धडक दिल्याची घटना समोर आली आहे. एमआयटी

Pune Weather : उकाड्यापाठोपाठ पुण्यात पुन्हा मुसळधार पावसाची एन्ट्री; हवामान विभागाकडून 'यलो अलर्ट' जारी

पुणे : गेल्या काही दिवसांपासून वाढलेली ऑक्टोबर हीट आणि प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांसाठी एक

नाचणीची भाकरी, भाजी अन् बांधावरील गप्पा; ग्रामस्थांशी संवाद साधत पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले जलसंधारण चळवळीला बळ

सिंधुदुर्ग : दुष्काळी परिस्थितीचा सामना करताना पाण्याचा प्रत्येक थेंब अडविणे, जमिनीत जिरविणे आणि उपलब्ध

AstraZeneca Pharma India : जागतिक बाजारपेठेत भारतीय औषध उद्योगांची प्रभावी कामगिरी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : “अमेरिका आणि युरोपसारख्या नियंत्रित बाजारपेठांमध्ये भारतीय औषधे, विशेषतः जेनेरिक औषधे, प्रभावी कामगिरी

राज्यातील सर्व शाळांमध्ये राज्य सरकार राबवणार विशेष स्वच्छता मोहीम, साफसफाई आणि किरकोळ दुरुस्तीवर देण्यात येणार भर

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये विशेष स्वच्छता मोहिम राबवण्यात येणार आहे. स्वच्छता

Jalna Healthcare Project : जालन्यात कर्करोग, हृदयरोगांसह गंभीर आजारांवर उपचार; 3 हेक्टर जागेला मंजुरी

मुंबई : मराठवाड्यातील गोरगरीब रुग्णांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जालना येथील