Sonali Bendre : अभिनेत्री सोनाली बेंद्रे अडचणीत, पुण्यातील मावळच्या शेतकऱ्यानं केले गंभीर आरोप

मुंबई : अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे (sonali Bendre) आणि तिचे पती गोल्डी (Goldie Behl) बेहल सध्या मोठ्या अडचणीत सापडले आहेत. पुण्यातील मावळमधील सुमारे ३० गुंठे जमिनीच्या व्यवहारात फसवणूक आणि नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप या सेलिब्रिटी जोडप्यावर करण्यात आला आहे.


सोनाली बेंद्रे आणि तिचा पती गोल्डी यांच्याविरोधात पुण्यातील वडगाव मावळ न्यायालयात याचिका दाखल करण्यात आला असून मौजे-उकसानमधील सर्व्हे नंबर १२१/१ येथील ३० गुंठे जागा परस्पर खरेदी केल्याचा आरोप चंद्रकांत बाळू शिंदे यांनी केला आहे. या प्रकरणानंतर सोनाली आणि गोल्डी बेहल यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पण, सोनाली बेंद्रे यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचा दावा, त्यांचे वकील राजू शिंदेंनी केला आहे.


१९५७ पासून ही जमीन माझे आजोबा केसू बाबाजी शिंदेंच्या नावावर असल्यानं या जागेवर तक्रारदार चंद्रकांत शिंदेंनी कुळ हक्क दाखवला आहे. मात्र, १९६५ सालीचं मावळच्या तत्कालीन तहसीलदारांनी केसू शिंदे या जागेचे मालक नाहीत, असं स्पष्ट केल्याचा दावा वकील राजू शिंदेंनी केलाय. पैसे उकळण्यासाठी चंद्रकांत शिंदेंकडून सोनाली बेंद्रे आणि गोल्डी बेहल यांच्यावर आरोप केले जात आहेत. असा प्रतिदावा वकील शिंदेंनी केला आहे.


अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि गोल्डी बेहल यांच्या बाजूनं वकीलांनी हे सर्व आरोप फेटाळले असून मुळात सोनाली बेंद्रेच्या नावावर ही जमीन नाही, त्यामुळे त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. असा दावा वकिल राजू शिंदे यांनी केला आहे.


तसेच, ८ जून १९६५ रोजी मावळच्या तत्कालीन तहसीलदारांनी दिलेल्या आदेशानुसार केसू शिंदे हे त्या जमिनीचे मालक नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. याबरोबरचं यापूर्वी अनेक वेळा तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी स्तरावर अपील करण्यात आलं. मात्र, प्रत्येक वेळी निर्णय त्यांच्या विरोधात गेला असल्याचा दावा बचाव पक्षाकडून करण्यात आला आहे. ऑक्टोबर २०२५ मध्ये मावळच्या तहसीलदारांनी तक्रारदाराचे अपील फेटाळले होते, त्यानंतर पुन्हा उपविभागीय अधिकाऱ्यांकडे हे प्रकरण गेलं. फक्त पैसे उकळण्यासाठी सतत हे प्रकरण उभं केलं जात आहे..." असा प्रतिदावा वकील राजू शिंदेंनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि पती गोल्डी बेहल यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’