Sourav Ganguly Biopic : लवकरच 'सौरव गांगुली'चा बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार, मुख्य भूमिकेत झळकणार 'हा' अभिनेता

मुंबई : भारतीय क्रिकेट विश्वातील दिग्गज खेळाडू सौरव गांगुलीच्या जीवनावर आधारित ‘दादा’ या बहुप्रतीक्षित बायोपिक सिनेमाचं चित्रीकरण सुरू झालं आहे. दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवाने यांच्या दिग्दर्शनाखाली हा सिनेमा तयार होत असून, या सिनेमात सौरव गांगुलीच्या भूमिकेत अभिनेता 'राजकुमार राव' झळकणार आहे.

या सिनेमाची निर्मिती लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्स या बॅनरखाली होत आहे. निर्मात्यांनी सोशल मीडियावर क्लॅपरबोर्डचा फोटो शेअर करत “लाईट्स, कॅमेरा, क्रिकेट! ‘दादा’चं चित्रिकरण सुरू झालंय,” अशी घोषणा केली आहे.

दिग्दर्शक मोटवानेंनीही त्यांच्या सोशल मीडियावर ईडन गार्डन्स इथं सौरव गांगुली स्टँडचा फोटो शेअर करत “आसनस्थ व्हा” असं कॅप्शन दिलं. दरम्यान, राजकुमार राव यांनी “सुरुवात झाली आहे… एकमेवाद्वितीय #दादा” असं म्हणत या प्रवासाची सुरुवात झाल्याची माहिती दिली आहे.



या सिनेमाच्या कथानकाबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी सौरव गांगुलींच्या क्रिकेट कारकिर्दीतील महत्त्वाच्या टप्प्यांचा यात समावेश असणार आहे. १९९२ ते २००८ दरम्यान भारताचे प्रतिनिधित्व करताना गांगुली यांनी कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये मिळून १८,५७५ धावा केल्या असून त्यांच्या नावावर ३८ शतके आहेत.

यापूर्वी २०२५ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत सौरव गांगुलीनं राजकुमार रावच्या निवडीचं स्वागत केलं होतं. “योग्य व्यक्ती ही भूमिका साकारत आहे. मी त्याला पूर्ण सहकार्य करेन,” असे त्यानं सांगितलं होतं. हा सिनेमा क्रिकेटप्रेमींसाठी आणि सौरव गागुलींच्या चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार असून हा सिनेमा पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
Comments
Add Comment

Dhanush-Mammootty Movie : धनुष आणि ममूटी पहिल्यांदाच एकत्र झळकणार ? ‘OM: Chapter 1’ चित्रपटाची चर्चा, रिलीज डेट आली समोर

Dhanush-Mammootty Movie : दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील दोन दिग्गज कलाकार एकाच चित्रपटात पाहायला मिळणार असल्याच्या चर्चेने

Yo Yo Honey Singh : 'यो यो हनी सिंग'च्या अडचणीत मोठी वाढ! आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी महाराष्ट्र सायबर सेलचा मोठा दणका

प्रसिद्ध रॅपर आणि संगीतकार हिरदेश सिंग, ज्यांना जगभर 'यो यो हनी सिंग' (Yo Yo Honey Singh) या नावाने ओळखले जाते, त्यांच्यामागील

Prime Video Chaar Yaar : प्राइम व्हिडिओच्या ‘चार यार’चा ट्रेलर प्रदर्शित; २००० च्या दशकातील मुंबईत उलगडणार गुन्हेगारी आणि मैत्रीची अनोखी कहाणी!

एक्सक्लुझिव्ह ओरिजिनल्ससाठी ओळखली जाणारी भारतातील आघाडीची स्ट्रीमिंग सेवा प्राइम व्हिडिओने आज आपल्या आगामी

Rajya Natya Spardha : राज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी अनुभवी कलाकारांना २५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धांना

Ranbali Movie Review : कागदावर धमाकेदार, पण पडद्यावर फिका? 'रणबाली' चित्रपट कसा आहे ?

साऊथचा लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडाच्या (Vijay Devarkonda) बाबतीत एकच गोष्ट वारंवार घडताना दिसते. त्याच्या एखाद्या

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण