Nagpur : नागपूरमध्ये ‘U-17 राष्ट्रीय बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा

मुंबई : महाराष्ट्राच्या बॉक्सिंग इतिहासात महत्त्वपूर्ण ठरणारी सातवी, १७ वर्षांखालील (अंडर १७) ज्युनिअर राष्ट्रीय बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा येत्या पाच एप्रिल ते ११ एप्रिल २०२६ दरम्यान नागपूर येथे पार पडणाऱ्या स्पर्धेची अधिकृत घोषणा, महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष,शिवसेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस माजी खासदार राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत केली. दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात गुरुवारी दुपारी चार वाजता आयोजित करण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेत संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष रणजीत सावरकर यांनी देखील संघटनेची भूमिका मांडली.


नागपूर येथे पार पडणाऱ्या या स्पर्धेत देशभरातून निवड झालेल्या युवा खेळाडूंना आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवण्याची मोठी संधी मिळणार आहे.या प्रतिष्ठित स्पर्धेत तब्बल २५० महिला खेळाडू आणि ३५० पुरुष खेळाडू सहभागी होणार असून, एकूण सहाशेहून अधिक बॉक्सर्स यावेळी रिंगमध्ये उतरतील. त्यांच्यासोबत १८० प्रशिक्षक व टीम मॅनेजर्स, तसेच संघटनेच्या वतीने ७० अधिकृत कर्मचारी सहभागी होणार आहेत.


पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना राहुल शेवाळे म्हणाले की, कंपनी ऍक्टनुसार तयार झालेल्या आमच्या संघटनेला बीएफआय (बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया) ने मान्यता दिल्यामुळे कोणत्याही वादाचा प्रश्नच नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांना पाठिंबा देण्यासाठी आणि महाराष्ट्रातल्या बॉक्सिंगपटूंच्या भविष्यासाठी सर्व जिल्हा संघटनांच्या सहकार्याने मी या क्षेत्रात प्रवेश केला आहे


संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष रणजीत सावरकर यांनी सांगितले की, "नोव्हेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेली निवडणूक प्रक्रिया बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाने रद्दबातल ठरवली होती. त्यानंतर, तांत्रिकदृष्ट्या कोणतीही संघटना राज्य पातळीवर कार्यरत नसल्याने खेळाडूंचे मोठे नुकसान होत होते. यासाठीच आम्ही कंपनी ऍक्ट अंतर्गत एक नवीन संघटना स्थापन करून बीएफआयच्या निरीक्षकांच्या उपस्थितीत मुंबईत या संघटनेची निवडणूक घेतली आणि या अध्यक्षांसह १३ पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड यावेळी करण्यात आली. यानंतर आमच्या संघटनेला बीएफआयने मान्यता दिली"


राहुल शेवाळेंचं प्रवीण दरेकरांना निमंत्रण : "आमदार प्रवीण दरेकर हे माझे चांगले मित्र आहेत.बॉक्सिंग क्षेत्रात कोणताही राजकीय वाद नसून पाच एप्रिलला सुरू होणाऱ्या राष्ट्रीय ज्युनियर बॉक्सिंग स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून काम करूया. या स्पर्धेसाठी मी प्रवीण दरेकर यांनाही निमंत्रित करतो" अशा शब्दांत राहुल शेवाळे यांनी दरेकरांना वादावर पडदा टाकण्याचे आवाहन केले. तसेच, माझ्या राजकीय भवितव्याची काळजी घेण्यासाठी माननीय उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब समर्थ आहेत. त्यामुळे माझ्या राजकीय भवितव्याची काळजी तुम्ही करू नका, असा टोलाही त्यांनी दरेकरांना लगावला.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून