भारतीय बाजारात रेडमी, विवो आणि रिअलमीचे स्मार्टफोन लॉन्च

फीचर्स आणि किंमतींमध्ये जोरदार स्पर्धा


मुंबई : भारतीय स्मार्टफोन बाजारात सध्या स्पर्धा अधिकच तीव्र होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर शाओमीच्या उपकंपनी रेडमी, तसेच विवो आणि रिअलमी या कंपन्यांनी आपले नवीन स्मार्टफोन लॉन्च करत ग्राहकांसाठी आकर्षक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.


रेडमीने आपला नवीन रेडमी नोट १५ एसई ५जी स्मार्टफोन भारतीय बाजारात सादर केला आहे. हा फोन विशेष एडिशन म्हणून लॉन्च करण्यात आला असून तो 7 एप्रिलपासून फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या अधिकृत ऑनलाइन स्टोअरवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.77 इंचाचा कर्व्ड AMOLED डिस्प्ले असून 120Hz रिफ्रेश रेट, 3200 निट्स पीक ब्राइटनेस आणि TÜV Rheinland सर्टिफिकेशन दिले आहे. Qualcomm Snapdragon 6 Gen 3 प्रोसेसरसह 8GB RAM आणि 256GB पर्यंत स्टोरेज मिळते. कॅमेऱ्याबाबत बोलायचे झाल्यास, 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. 5800mAh बॅटरी आणि 45W फास्ट चार्जिंगमुळे हा फोन अधिक प्रभावी ठरतो. या फोनची सुरुवातीची किंमत 24,999 रुपये ठेवण्यात आली असून विविध बँक ऑफर्समुळे ग्राहकांना सवलतीचाही लाभ मिळणार आहे.


दुसरीकडे, विवोने आपला नवीन विवो व्ही७० एफई स्मार्टफोन मिड-रेंज सेगमेंटमध्ये सादर केला आहे. या फोनमध्ये 6.23 इंचाचा OLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि HDR10+ सपोर्ट दिला आहे. MediaTek Dimensity 7360-Turbo प्रोसेसरसह 12GB RAM आणि 512GB स्टोरेजपर्यंत सुविधा मिळते. या फोनची सर्वात मोठी खासियत म्हणजे 200 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा असून OIS सपोर्टसह उत्कृष्ट फोटोग्राफीचा अनुभव देतो. याशिवाय 50 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देखील दिला आहे. 7000mAh ची मोठी बॅटरी आणि 90W फास्ट चार्जिंग यामुळे हा फोन जास्त काळ वापरासाठी उपयुक्त ठरतो. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 37,999 रुपये असून 9 एप्रिलपासून विक्री सुरू होणार आहे. विविध बँक ऑफर्स आणि EMI पर्यायांमुळे ग्राहकांसाठी हा फोन अधिक आकर्षक बनला आहे.


दरम्यान, रियलमीने देखील आपला रियलमी १६ ५जी स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या फोनमध्ये 6.57 इंचाचा AMOLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि 4200 निट्स ब्राइटनेस दिला आहे. MediaTek Dimensity 6400 Turbo प्रोसेसरसह हा फोन येतो, जो दैनंदिन वापरासाठी योग्य असला तरी उच्चस्तरीय गेमिंगसाठी मर्यादित मानला जातो. कॅमेऱ्याच्या बाबतीत 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 50 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. विशेष म्हणजे, रियर कॅमेरासोबत सेल्फी मिररची सुविधा देण्यात आली आहे. 7000mAh बॅटरी आणि 60W फास्ट चार्जिंगमुळे दीर्घकाळ वापर शक्य आहे. या फोनची सुरुवातीची किंमत 31,999 रुपये असून 5 एप्रिलपासून विक्री सुरू होणार आहे.


एकूणच पाहता, रेडमी, विवो आणि रिअलमी या तिन्ही कंपन्यांनी वेगवेगळ्या किंमत आणि फीचर्ससह स्मार्टफोन बाजारात उतरवले आहेत. कॅमेरा, बॅटरी, डिस्प्ले आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत प्रत्येक फोन आपली वेगळी ओळख निर्माण करत असून ग्राहकांसाठी आता अधिक पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांनी आपल्या गरजेनुसार आणि बजेटनुसार योग्य स्मार्टफोन निवडण्याची संधी या लॉन्चमुळे निर्माण झाली आहे.

Comments
Add Comment

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींकडून भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर साध्य केल्याबद्दल कौतुक

नवी दिल्ली : 2026-27 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर (GDP) साध्य

Trendy Earrings for Traditional Look : पारंपरिक कार्यक्रमात घाला हे ट्रेंडी कानातले; तुमचा लूक दिसेल आणखी सुंदर आणि स्टायलिश!

मुंबई : लग्नसराई, सण-समारंभ किंवा कोणताही पारंपरिक कार्यक्रम म्हटलं की महिलांना आपल्या लूकमध्ये काहीतरी खास

Leftover Rice Recipe : आता उरलेला भात कधीच वाया जाणार नाही! घरातच बनवा चटपटीत राईस कुरकुरे; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खुश

तुम्हीही रात्रीचा किंवा दुपारचा उरलेला भात शिळा झाला म्हणून फेकून देण्याच्या विचारात आहात

Nashik Kumbhmela : कुंभमेळा संपूर्ण मानवजातीचा, गोदावरी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने काम करावे - निवृत्ती महाराज इंदुरीकर

Nashik : समुद्रमंथनातून प्राप्त अमृताचे थेंब चार ठिकाणी पडले, त्यापैकी चौथा थेंब नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पडल्याने

Nashik : मिशन ग्रीन मान्सून’चा १० वा टप्पा संपन्न , गंगापूर धरण परिसरात ५ हजार देशी वृक्षांची लागवड

Nashik : नाशिक शहर आणि जिल्ह्याला स्वच्छ, सुंदर, हरित आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या व्यापक उद्देशाने पालकमंत्री ना.

Nashik : नोकरीचे आमिष दाखवले अन् ३ लाख ३० हजार उकळले, गुन्हा दाखल

Nashik : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आमिष दाखवून