Mumbai Goa Expressway : कोकणात विकेंड रश; मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

माणगाव : उन्हाळी सुट्ट्यांची सुरुवात आणि सलग तीन दिवसांचा विकेंड यामुळे कोकणाच्या दिशेने पर्यटकांचा ओघ प्रचंड वाढला आहे. या गर्दीचा थेट परिणाम महामार्गावरील वाहतुकीवर दिसून येत असून अनेक ठिकाणी कोंडीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.


माणगाव परिसरात प्रचंड ट्रॅफिक झाले आहे. बाजारपेठेतील अरुंद रस्ते, स्थानिक वर्दळ आणि महामार्गावरील वाहनांचा वाढलेला ताण यामुळे येथे वाहतूक संथ गतीने सुरू आहे. काही ठिकाणी परिस्थिती इतकी बिकट झाली की वाहनांच्या रांगा या अनेक किलोमीटरपर्यंत लागलेल्या दिसल्या.


कोकणाकडे जाणाऱ्या मार्गांवरही अशीच स्थिती असून प्रवाशांना तासन्‌तास प्रवास करावा लागत आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी हा प्रवास अधिकच त्रासदायक ठरत आहे. दरम्यान, वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिस आणि प्रशासनाकडून विशेष प्रयत्न सुरू आहे.


प्रशासनाकडून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आणि शक्य असल्यास प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जोपर्यंत माणगाव बायपास चे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत पर्यटकांना भेडसावणारी ट्रॅफिकची हे समस्या कायम राहणार आहे.

Comments
Add Comment

तडजोड नको! एअर इंडिया इमारत आणि आमदार निवासाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचे आदेश

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक घेत प्रमुख विकासकामांचा थेट

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.