Elphinstone Bridge Update : आज रात्री प्रभादेवी पुलाचा ११३ वर्षांचा इतिहास जमा होणार; परंतु लोकल अन् एक्सप्रेवर...

मुंबई : मुंबईतील जुन्या बांधकामाचे पुनरुज्जीवन करून मुंबई आता पूर्णपणे नव्याने उदयाला येत आहे. त्यात ब्रिटिशकालीन असलेले मुंबईतील अनेक इतिहासकालीन पुलांचे बांधकाम नव्याने केले जात आहे. ११३ वर्ष जुना असलेला प्रभादेवीचा पूल हा त्यातीलच एक...


११३ वर्ष जुना आणि ऐतिहासिक एल्फिन्स्टन पूल १२ सप्टेंबर २०२५ पासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. पाडकामाला सुरुवात करण्यात आली होती. आणि आता त्यानंतर आज ४ एप्रिल रोजी मध्यरात्रीपासून अंतिम पाडकाम मध्य रेल्वेकडून केले जाणार आहे.



डबल डेकर पुलाचे नियोजन


प्रभादेवीचा उड्डाणपूल हा वरळी- शिवडी प्रकल्पाचा भाग असलेला ब्रिटिशकालीन पूल आहे. हा पूल पाडून त्या जागी नवीन डबलडेकर पूल उभारण्याचे नियोजन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ( MMRDA ) यांनी केले आहे. शिवाय या कामाची जबाबदारी महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्याकडे आहे.



लोकलवर होणारा परिणाम


प्रभादेवीच्या पुलाच्या कामामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेवर परिणाम होणार आहे प्रभादेवीच्या पुलामुळे अनेक लोकल आणि एक्सप्रेस गाडी दादर आणि भायखळा मार्गे जणार आहे. प्रभादेवी पुलाचे मध्य रेल्वे भागातील पॅनल काढण्यासाठी शनिवारी रात्री १०.३० वाजल्यापासून ते रविवारी सकाळी ६ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. शेवटचा आणि मुख्य ब्लॉक काढण्याचे काम शनिवारी रात्री ११.३० वाजता सुरु होणार असले तरी ओव्हर हेड वायर हटविण्यासाठी संपूर्ण मार्गिका १ तास आधी बंद ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे सीएसएमटी ते दादर रेल्वेस्थानक दरम्यानच्या उपनगरीय सेवा पूर्णपणे बंद राहतील.



पूर्व आणि पश्चिम मुंबईत वाहतूक कोंडी


मुंबईतील परळ आणि प्रभादेवीला जोडणारा हा ११३ वर्ष जुना पूल पाडायला सुरुवात केल्यापासून नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. पण हा पूल बांधला गेल्याने वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. हा पूल पाडून या ठिकाणी डबल-डेकर उड्डाणपूल उभारला जाणार आहे. जो शिवडी -वरळी कनेक्टर ला जोडला जाणार आहे. जुन्या पुलापेक्षा जास्त लांबीचा ४.५ किमी तसेच अत्याधुनिक डबल डेकर पूल बांधला जाणार आहे. त्यामुळे पूर्व आणि पश्चिम मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होईल



मेल- एक्सप्रेस गाड्यांवर होणारा परिणाम


पुलाच्या अंतिम पाडकामामुळे उपनगरीय आणि मेल एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकानुसार परिणाम होणार असून गाड्या दादर/ भायखळा मार्गे वळवल्या जातील. नवीन पूल तयार झाल्यावर दक्षिण मुंबईतील प्रवाशांना वरळी आणि वांद्रे - वरळी सी लिंककडे जाणे सोपे होईल.  वाहतूक कोंडी सुटायला देखील मदत होणार असून प्रभादेवीचा हा पूल आपल्याला लवकरच नव्या सुविधांसह, सुसज्ज सोयींसह लवकरच मिळणार आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने