Mumbai Local News Update : पश्चिम रेल्वेवर धावणार १५ डब्याच्या लोकल ; वांद्रे स्थानकावरून....

मुंबई : मुंबईतील वाढती लोकसंख्या आणि त्यानुसार वाढणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता उपनगरी रेल्वे व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण होत आहे. विशेषतः ऑफिसच्या वेळेत लोकल गाड्यांमध्ये होणारी प्रचंड गर्दी ही प्रवाशांसाठी मोठी समस्या बनली आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून १५ डब्यांच्या लोकल गाड्यांचा विस्तार करण्याची तयारी सुरू आहे.



गर्दी कमी करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल


सध्या पश्चिम रेल्वे मार्गावर अंधेरी ते विरार या दरम्यान काही प्रमाणात १५ डब्यांच्या लोकल गाड्या धावत आहेत. या गाड्यांना प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे, शिवाय या सेवेचा आणखी विस्तार व्हावा अशी मागणी नागरिक करत आहेत. विशेषतः वांद्रेपर्यंत या गाड्यांचा विस्तार केल्यास मुंबईच्या उपनगरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.



पायाभूत कामांना वेग


१५ डब्यांच्या लोकल गाड्या चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांवर सध्या युद्धपातळीवर काम सुरू आहे. वांद्रे, खार रोड, सांताक्रूझ आणि विलेपार्ले या स्थानकांवर फलाटांचा विस्तार केला जात आहे. याशिवाय रुळांमध्ये सुधारणा, ओव्हरहेड वायरचे काम आणि सिग्नल प्रणाली अद्ययावत करण्याचे कामही सुरू आहे. ही सर्व कामे पूर्ण झाल्यानंतरच १५ डब्यांच्या लोकल गाड्या या मार्गावर नियमितपणे धावू शकतील.



डिसेंबर २०२६पर्यंत काम होईल पूर्ण


रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हे सर्व काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानंतर वांद्रे स्थानकावरून १५ डब्यांच्या लोकल फेऱ्या सुरू होण्याचा मार्ग मोकळा होईल. यामुळे प्रवाशांची गर्दी विभागण्यास मदत होईल



प्रवाशांना दिलासा मिळणार


या प्रकल्पामुळे दररोज प्रवास करणाऱ्या लाखो मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. गर्दीच्या वेळेत होणारी चेंगराचेंगरी आणि असुविधा कमी होऊन प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी प्रवास मुंबईकरांना करता येणार आहे.

Comments
Add Comment

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक