Nitesh Rane : मुंब्र्याचे नाव 'मुंब्रादेवी' करणार! - मंत्री नितेश राणे

- मदरशांमध्ये डॉक्टर-इंजिनिअर नव्हे, दहशतवादी तयार होतात


मुंबई : "मुंब्रा-कळवा परिसर हिरवा करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, तुम्ही शंभर जन्म घेतले तरी तुमचे हे मनसुबे कधीही पूर्ण होणार नाहीत. हा कोणाच्या अब्बाचा मुंब्रा नाही, तर हे आमच्या हिंदू राष्ट्रातील 'मुंब्रादेवी'चे क्षेत्र आहे. ज्याप्रमाणे आम्ही इस्लामपूरचे 'ईश्वरपूर' केले, त्याचप्रमाणे लवकरच मुंब्र्याचे अधिकृत नाव 'मुंब्रादेवी' करून येथील हिंदू अस्मिता पुन्हा प्रस्थापित करू," असा वज्रनिर्धार राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.


मुंब्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या रोखठोक भाषणातून जिहादी मानसिकता आणि हिंदूविरोधी शक्तींवर प्रहार केला. काही लोकप्रतिनिधींच्या चिथावणीखोर वक्तव्यांचा समाचार घेताना नितेश राणे म्हणाले की, "अशी विखारी विचारधारा मदरशांमधूनच बाहेर येते. मदरशांमध्ये बसवून कोणाला डॉक्टर किंवा इंजिनिअर बनवले जात नाही, तिथे केवळ दहशतवादी तयार केले जातात. अशा सर्व मदरशांना कुलूप लावून या दहशतवाद्यांना बाहेर काढण्याची वेळ आली आहे. धर्मांतरविरोधी कायद्यानंतर आता पुढचा नंबर हा मदरशांचाच असेल, हे लक्षात ठेवा."


मंत्री राणे म्हणाले, "आम्ही लव्ह जिहादविरोधी कायदा आणला आहे. आता जर कोणत्या शाहरुख किंवा आमिरने आमच्या हिंदू बहिणीकडे वाकड्या नजरेने पाहिले, तर त्यांना सात वर्षे तुरुंगाची हवा खावी लागेल. तिथे त्यांना साधे साबण उचलण्याचीही मुभा मिळणार नाही." त्याचप्रमाणे 'जितुद्दीन'सारख्या नेत्यांना मी सकाळी नाश्त्याला खातो', असा हल्लाबोलही त्यांनी केला.



हिंदूंची ताकद महत्त्वाची!


"मी कोणत्याही गोल टोपी किंवा दाढीवाल्यांच्या मतांनी आमदार-मंत्री झालेलो नाही. हिंदू समाजाने दिलेल्या आशीर्वादाच्या जोरावर मी इथे उभा आहे. आम्हाला त्यांच्या पाच मतांची चिंता नाही, कारण त्यांच्या पाच मतांच्या बदल्यात आमचा हिंदू समाज आम्हाला ५० मते देण्याची ताकद deveठेवतो," असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.





हा देवाभाऊंचा महाराष्ट्र आहे...


मंत्री नितेश राणे म्हणाले, "हिंदू समाजाला घाबरवण्याचे प्रयत्न करू नका. जर आमचा तिसरा डोळा उघडला, तर शुक्रवारी तुमचे 'सिलेंडर'सुद्धा वर येणार नाहीत, याची काळजी आम्ही घेऊ. हा देवाभाऊंचा महाराष्ट्र आहे, 'घुसेगा भी और मारेगा भी', असा इशाराही त्यांनी दिला.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण