Pravin Darekar : जुहू, दहिसर, अंधेरीतील रखडलेला पुनर्विकास मार्गी लागणार

दरेकर अभ्यासगटाच्या आणखी एका शिफारशीची अंमलबजावणी


मुंबई : दरेकर अभ्यासगटाच्या एका महत्वपूर्ण शिफारशीची अंमलबजावणी होतेय, याचा विशेष आनंद आहे. यामुळे जुहू आणि डी.एन.नगर परिसरातील शेकडो इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होईल, अशी प्रतिक्रिया रखडलेल्या पुनर्विकासाबाबत शासनाने नेमलेल्या दरेकर अभ्यासगटाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं/समुह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी दिली.


विमानपत्तन प्राधिकरणाने १८ मार्चला एक परिपत्रक काढले असून दहिसर व डी.एन.नगर परिसरातील इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पांचा मार्ग मोकळा केला आहे. विमानपत्तन प्राधिकरणाच्या ट्रान्समीटर व रिसीव्हर स्टेशन्सच्या परिघात असलेल्या इमारतींचा उंचीच्या निर्बंधांमुळे अनेक इमारतींचा पुनर्विकास रखडला होता. विशेषकरुन स्वयंपुनर्विकास प्रकल्प आणि झोपु प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरत नव्हते. हे प्रकल्प व्यवहार्य ठरण्यासाठी दरेकर अभ्यासगटाने त्यांच्या अहवालातील प्रकरण २४ मध्ये रडार अन्यत्र स्थलांतरित करावेत, अशी महत्वपूर्ण शिफारस केली होती. आता हे रडार अन्यत्र स्थलांतरित करण्यात येणार आहेत. तसेच पुनर्विकास प्रस्तावांचा अभ्यास करुन उंचीचा निर्णय घेण्यासाठी समिती देखील स्थापन करण्यात येणार आहे.


दरेकर असेही म्हणाले की, जानेवारी २०२६ मध्येच केंद्रीय विमान वाहतूक मंत्र्यांनी रडार अन्यत्र स्थलांतरित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. आता त्याबाबतचे परिपत्रक आलेले आहे. दरेकर अभ्यासगटाने शासनाला अहवाल सादर केल्यानंतर सातत्याने यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता. आता या महत्वपूर्ण शिफारशीची अंमलबजावणी प्रत्यक्षात जमिनीवर होईल, प्रकल्पांबाबत नेमलेली समिती शक्य तितक्या लवकर पुनर्विकास प्रकल्पांना मंजुरी देईल आणि या भागातील लोकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने