Ashok Kharat Case : भोंदूबाबा प्रकरणातील स्त्रिया मानसिक धक्क्यात; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे.....

मुंबई : नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने आता अधिक गंभीर वळण घेतले आहे, भोंदूबाबा सोबतचे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओंमुळे पीडित महिलांवर मानसिकदृष्ट्या मोठा परिणाम झाला आहे. आरोपीकडून झालेल्या शोषणानंतर आता त्याच्याशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने पीडिता मानसिक धक्क्यात गेल्या आहेत.



व्हायरल व्हिडिओंमुळे ओळख उघड


गेल्या काही दिवसांत अशोक खरातच्या केबिनमधील काही आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओंमध्ये महिलांचे चेहरे स्पष्ट दिसत असल्याने त्यांच्या ओळखी उघड होण्याची भीती निर्माण झाली आहे. पोलिसांनी वारंवार व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांवर गुन्हा नोंदवला जाईल असे इशारे देऊनही हे व्हिडिओ शेअर केले जात असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे.



पीडित महिलांवर मानसिक परिणाम


या प्रकरणातील किमान आठ ते नऊ महिलांनी मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेतल्याची माहिती समोर आली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या महिला नैराश्य, भीती आणि असुरक्षिततेच्या भावनेत सापडल्या आहेत. अनेकांना समाजात वावरताना लाज, अपमानित वाटत असून एकटेपणाची भावना सतावत असल्याचे समजते.



पोलिसांची कारवाई आणि आवाहन


या प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाकडून पीडित महिलांना पूर्ण सुरक्षा दिली जात आहे. तसेच कोणत्याही प्रकारचा दबाव न घेता पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यांच्याकडून माहिती जाणून घेताना चौकशीची जागा ही पूर्णपणे गुप्त ठेवली जात आहे. सायबर पोलिसांकडून व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर लक्ष ठेवले जात असून, अशा व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.



कुटुंबीयांवरही संशयाची साखळी


दरम्यान, तपासादरम्यान अशोक खरात याचा मुलगा हर्षवर्धन हा फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी त्याची चौकशी करून त्याला सोडण्यात आले होते. मात्र सध्या त्याचा संपर्क होत नसल्याने तो पळून गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वीच त्याची पत्नी कल्पना खरातही फरार झाली आहे.



दुहेरी संकटात अडकलेल्या पीडित महिला


या प्रकरणात पीडित महिलांना आधी शारीरिक आणि आर्थिक शोषणाचा सामना करावा लागला, तर आता व्हिडिओ व्हायरलमुळे मानसिक छळ सहन करावा लागत आहे. त्यामुळे या प्रकरणात केवळ आरोपींवर कठोर कारवाईच नव्हे, तर स्त्रियांची आणखी बदनामी होणार नाही याची देखील काळजी घेतली गेली पाहिजे.

Comments
Add Comment

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर