Mumbai: तुमचा वर्षाचा पगार नाही एवढी मोठी लाच, मंत्रालयातील कक्ष अधिकारी जाळ्यात; एसीबीने ठोकल्या बेड्या..

मुंबई: राज्याचं प्रशासन सेवेतलं सर्वोच्च स्थान, केंद्रबिंदु असलेल्या मंत्रालयात काही दिवसांपूर्वी एका अधिकाऱ्यास, मंत्र्याच्या स्वीय सहायकास लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली होती. त्यानंतर, मंत्रालयातल्या आणखी एका अधिकाऱ्याला लाच घेतला लाच लुचपत प्रतिबंधन विभागाने अटक केली आहे. खारघर परिसरात लाच घेताना सापळा रचून एसीबीकडून लाचखोर अधिकाऱ्यास बेड्या ठोकण्यात आल्या. अर्थ व नियोजन विभागात कक्ष अधिकारी म्हणून असणारे विलास लाड यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. निधी मंजूर करून देण्यासाठी तब्बल ६ लाख ३७ हजार रुपयांची मोठी लाच घेताना अटकेची कारवाई करण्यात आली.


मंत्रालयातल्या कामासाठी लाच घेण्याचा प्रयत्न केल्याचं दुसर मोठ प्रकरण समोर आलं असून मंत्रालयातल्या लाचखोरीला चाप बसवण्यासाठी एसीबीने पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. विशेष म्हणजे मार्च महिन्यात एसीबीने कारवाईचा धडाका लावला होता, तेव्हा मार्च एन्डमुळे ही कारवाई होत असल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात होती. मात्र, आता एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात एसीबीने पुन्हा एकदा आपला मोर्चा थेट मंत्रालयात वळवला आहे. मंत्रालयातील कक्ष अधिकारी असलेल्या विलास लाड याला रंगेहाथ अटक करण्यात आली. विशेष म्हणजे सर्वसामान्य माणसांचा एका वर्षाचा पगारही नसतो, तेवढी मोठी रक्कम लाच स्वरुपात हा अधिकारी एका दिवसात घेत होता. त्यामुळे, प्रशासन आणि सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचार व सर्वसामान्यांची होणारी पिळवणूक हा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे.


ग्रामविकास विभागाचा निधी मंजूर करुन देण्यासाठी या अधिकाऱ्याने लाच मागितली होती, त्यानुसार ६ लाख ३७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने लाचखोर आरोपीस अटक केली. खारघर परिसरात एसीबीने ट्रॅप रचून ही कारवाई केल्याने मंत्रालयातील प्रशासकीय वर्तुळात आणि प्रशासनात खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी