विरारमध्ये आणखी २ प्लॅटफॉर्मवरून धावणार १५ डब्यांच्या लोकल
April 6, 2026 12:53 PM
vasai virar local
चार महिन्यांत प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम पूर्ण
विरार : पश्चिम रेल्वेच्या विरार रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. यामुळे आता या स्थानकावर १५ डब्यांच्या लोकल ट्रेन सहजपणे थांबू शकतील. प्लॅटफॉर्म क्रमांक ३ आणि ४ ची रुंदी ४ मीटरने वाढवण्यात आली असून, हे काम 'मुंबई रेल्वे विकास महामंडळाने' (MRVC) अवघ्या ४ महिन्यांच्या विक्रमी वेळेत पूर्ण केले आहे. यासोबतच, स्थानकाच्या पश्चिम भागात नवीन 'होम प्लॅटफॉर्म क्रमांक ८' देखील तयार करण्यात आला आहे. यामुळे विरार स्थानकावरून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या लोकल गाड्यांचे संचलन अधिक सुलभ आणि शिस्तबद्ध होणार आहे. लवकरच या नवीन प्लॅटफॉर्मवरून १५ डब्यांच्या लोकल सेवा सुरू केल्या जातील. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, तयार झालेले सर्व प्लॅटफॉर्म लवकरच पश्चिम रेल्वेच्या प्रशासनाकडे सोपवण्यात येतील.