मुंबईतील रेलिंगचे वाढीव दराने कंत्राट कुणाच्या दबावाखाली दिले; शिवसेना अमेय घोले यांचा उबाठाला सवाल

मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने संभाव्य कंत्राट कामांच्या निविदा भाजपने पारदर्शी कारभाराची चुणूक दाखवून रद्द करण्यास भाग पाडले. परंतु या सर्व निविदा महायुतीच्या वतीने रद्द करण्यात आल्या असून जेम पोर्टलवर निविदा मागवण्याचा आग्रह भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा आहे. त्यामुळे यातील रेलिंगचे कंत्राट हे सन २०२१मध्ये कुणाच्यातरी दबावानुसार दिले होते. त्यामुळे त्याच कंपनीला पुन्हा देण्याचा घाट घालण्यात आला होता,त्यामुळे ही निविदाच रद्द करण्यात आल्याचे सांगत शिवसेना गटनेते अमेय घोले यांनी अप्रत्यक्षपणे उबाठाचे नेते आदित्य ठाकरेंच्या आशिर्वादामुळे कामे मिळवणाऱ्या कंपनीला बाहेरचा रस्ता दाखवल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे ही निविदा रद्द करत एकप्रकारे आदित्य ठाकरेंना धक्का दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


मुंबई महापालिकेच्यावतीने पदपाथ रेलिंग, लेन मार्किंग, विस्तारीत प्राणिसंग्रहालय तसेच शालेय वस्तूंची खरेदी आदींच्या निविदा रद्द करण्यात आल्या आहेत. याबाबत सभागृहनेते गणेश खणकर आणि शिवसेना गटनेते अमेय घोले यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेवून या चारही प्रस्तावित कामांच्या निविदा या महायुतीच्यावतीने मागणी करून रद्द करण्यास प्रशासनाला भाग पाडले आहे. महापालिकेत भाजप म्हणून नव्हेतर महायुती म्हणूनच निर्णय घेतले जातात असेही त्यांनी स्पष्ट केले. कोणत्याही निविदा जेम पोर्टलवर काढल्या जाव्यात याबाबत महायुतीचे एकमत असून पारदर्शक कामकाजाच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेतला जात आहे. यामुळे महापालिकेच्या कोट्यवधी रुपयांची बचत केली जात आहे.


विस्तारीत प्राणिसंग्रहालयचा खर्च वाढीव असल्यामुळे तसेच लेन मार्किंगचा समावेश रस्ते कंत्राटांमध्ये करण्यासाठी रद्द करण्यात आली आहे. तर शालेय वस्तूंच्या खरेदीमध्ये पादर्शकता आणण्यासाठी जेम पोर्टलद्वारे निविदा मागवण्यासाठी रद्द करण्यात आले. तर रस्ते लगतच्या रेलिंगचे काम यापूर्वी शांतीनाथ रोडवेज या कंपनीला देण्यात आले होते. हे काम सन २०२१मध्ये तत्कालिन सहआयुक्त आशुतोष सलिल यांना स्वाक्षरी करायची नव्हती तरी देत देण्यात आले. त्यावर आशुतोष सलिल यांच्यावर कुणाचा दबाव होता असे सांगत एकप्रकारे उबाठाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर उंगली निर्देश केला. त्यामुळे पुन्हा त्याच कंपनीला वाढीव दराने कंत्राट देण्याचा प्रयत्न झाल्यामुळे हे कंत्राट रद्द करायला भाग पाडले. यामध्ये नक्की कुणाला धक्का दिला हे आता टिका करणाऱ्या उबाठाने आणि त्यांच्या मुखपत्राच्या संपादकाने ठरवावे असे अमेय घोले आणि भाजपचे सभागृहनेते गणेश खणकर यांचा समाचार घेतला.


 

 
Comments
Add Comment

Milind Soman Fitness : वयाच्या 60 व्या वर्षीही फिटनेस जबरदस्त! मिलिंद सोमण यांचा 15 मिनिटांचा वर्कआउट आणि फिटनेस मंत्र

Milind Soman Fitness Routine : वयाच्या ६० व्या वर्षीही उत्तम फिटनेस आणि उत्साह कायम ठेवणारे अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण

Nashik Crime : नराधमाला फाशीच ! डोंगराळे बालिका अत्याचार व हत्या प्रकरणात विजय खैरनारला फाशीची शिक्षा, जलदगती न्यायालयाचा मोठा निकाल

Nashik Crime : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील साडेचार वर्षांच्या बालिकेवरील लैंगिक अत्याचार आणि

Mobile New Rules: Truecaller शिवाय कळणार अनोळखी कॉल कोणाचा! 1 नोव्हेंबरपासून मोबाईलवर दिसणार कॉल करणाऱ्याचं नाव

Mobile New Rules: मोबाईलवर अनोळखी नंबरवरून कॉल आल्यास तो नेमका कोणाचा आहे, हे जाणून घेण्यासाठी अनेकजण Truecaller सारख्या अ‍ॅपचा

Jio Platforms IPO : रिलायन्सचा मोठा निर्णय; Jio IPO प्राईस बँड जाहीर, भागधारकांना विशेष लाभ!

Jio Platforms IPO: मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजची डिजिटल आणि टेलिकॉम कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्सचा

प्रेमासाठी काय पण ! 75 वर्षीय रामसुगर 30 वर्षांच्या रानी राजपूतशी बांधणार लग्नगाठ, साखपुड्याचा व्हिडीओ व्हायरल

उत्तर प्रदेश : प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं म्हटलं जातं. उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील एका अनोख्या

Cotton Rate : कापसाच्या दरात तेजीचे संकेत ! भाव 10 हजारांचा टप्पा ओलांडणार? शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या

Cotton Rate : राज्यात यंदा कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एल निनोचा प्रभाव, पावसातील मोठे