गोरेगाव संतोषनगरमध्ये दोन गटात हाणामारी,महापालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर चालवला गेला 'बुलडोझर'

मुंबई : गोरेगाव पूर्व येथील संतोषनगर परिसरात रविवारी घडलेल्या हिंदू आणि मुस्लिम गटांतील हाणामारीच्या घटनेनंतर सोमवारी महापालिकेच्या पी पूर्व विभागाच्या वतीने हल्लेखोर लोकांच्या अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चढवून ती बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. यात पान पट्टीच्या दुकानांसह काही कच्च्या बांधकामांवर हातोडा चालवण्यात आला.


गोरेगाव पूर्व संतोषनगर परिसरात दोन वेगवेगळ्या समुदायातील तरुणांमध्ये शुल्लक कारणावरून बाचाबाची झाली. याचे रूपांतर काही वेळातच मोठ्या भांडणात झाले. दोन्ही बाजूंकडून दगडफेक आणि घोषणाबाजी करण्यात आल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला पांगवले आणि परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला. यावेळी मुस्लिम जमावाकडून तलवारी काढून हल्ला करण्यात आला. यात दोन तरुण जखमी झाले होते.


या राड्याच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगरपालिकेने या भागातील अनधिकृत अतिक्रमणांची गंभीर दखल घेतली. पालिकेच्या पी-पूर्व विभागाने पोलीस संरक्षणात सोमवारी संतोषनगरमधील अरुंद रस्ते आणि सार्वजनिक जागेवर उभारलेली अनधिकृत बांधकामे जमिनदोस्त केली आहे. महापालिकेने केलेल्या या कारवाईत अनेक कच्चे-पक्के शेड आणि भिंतीचे बांधकाम पाडून रस्त्यात अडथळा ठरणारी बांधकामे हटवण्यात आली.


अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार,भविष्यात असे राडे झाल्यास पोलीस गाड्यांना फिरणे सोपे व्हावे, यासाठी रस्ते मोकळे करण्यात आले.तसेच या हाणामारीत सहभागी असलेल्या समाजकंटकांच्या बेकायदेशीर मालमत्तांचीही पालिका प्रशासनाकडून चौकशी केली जात आहे.



परिसरात शांततेचे आवाहन


दरम्यान ,सध्या संतोषनगरमध्ये वातावरण शांत झाले असले तरी राज्य राखीव पोलीस दलाच्या (SRPF) तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तरी अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अनधिकृत बांधकामे हटवल्यामुळे काही प्रमाणात रोष व्यक्त केला जात असला तरी, "कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ही कारवाई आवश्यक होती," असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने