Matunga Fire : माटुंगा वर्कशॉपमध्ये ट्रेनच्या डब्यांना भीषण आग; धुरामुळे परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : मुंबईतील माटुंगा रेल्वे वर्कशॉप येथे आज म्हणजेच मंगळवार ७ एप्रिल रोजी दुपारी उभ्या असलेल्या ट्रेनच्या डब्यांना अचानक आग लागल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलाच्या तातडीच्या प्रयत्नांमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.



एसी कोचमध्ये लागली अचानक आग :


मिळालेल्या माहितीनुसार, हे वर्कशॉप मध्य रेल्वे अंतर्गत असून येथे ट्रेनच्या डब्यांची दुरुस्ती आणि देखभाल केली जाते. वर्कशॉपच्या आवारात उभ्या असलेल्या एसी कोचमध्ये अचानक आग लागली. उपकरणांमध्ये झालेल्या बिघाडामुळे ही आग लागल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. काही वेळातच आगीने भीषण रूप धारण केले आणि धुराचे मोठे लोट परिसरात पसरले.



अनेक अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल :


घटनास्थळी उपस्थित कर्मचारी आणि नागरिकांमध्ये घबराट पसरली. आग लागल्याची माहिती मिळताच तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. काही मिनिटांतच अनेक अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि मोठ्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. आग इतर डब्यांपर्यंत पसरू नये म्हणून परिसर रिकामा करण्यात आला. खबरदारीचा उपाय म्हणून वैद्यकीय पथकही तैनात करण्यात आले होते.





विशेष म्हणजे या घटनेचा लोकल रेल्वे सेवांवर कोणताही परिणाम झाला नाही, मात्र माटुंगा रेल्वे स्थानक परिसरात धुरामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.


दरम्यान, याआधीही कुर्ला स्थानक येथे यार्डात उभ्या असलेल्या लोकल ट्रेनच्या डब्यांना आग लागल्याची घटना घडली होती. अशा घटनांची पुनरावृत्ती होत असल्याने नागरिकांनी रेल्वे सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने