रस्ते विकासाच्या कामांबाबत मनसेच्या किल्लेदारांचा स्थायी समिती अध्यक्षांना सवाल

अर्थसंकल्पावरील भाषणात घेतला समाचार


मुंबई : मुंबईतील अनेक रस्त्यांच्या कामांच्या विकासाची कामे महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आली आहे. याबाबत स्थायी समिती अध्यक्षांनी आपल्या भाषणात केलेल्या सूचनेची दखल घेत मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार यांनी त्यांचा समाचार घेतला. रस्ते कामांमध्ये सध्या कोणता कोणता धोरणात्मक बदल झाला आहे,असा सवाल करत किल्लेदार यांनी आपण डांबरी रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करत आहात, हा धोरणात्मक बदल आहे का? किंबहुना हे सिमेंट काँक्रीट चे जुने रस्ते होते ते तोडून पुन्हा सिमेंट काँक्रीटचे बनवतोय हा धोरणात्मक बदल आहेत का अशी विचारणा केली. मुंबईतील जे रस्ते १९८९ पासून जे आपण सिमेंट काँक्रीटचे बनवले होते. त्यांना तीस वर्षानंतर कुठे भेगा पडल्या आहेत ते दाखवा, पण आता आपण जे नवीन रस्ते बनवले जात आहेत, त्यातील बहुतांशी रस्त्यांवर भेगा पडलेल्या आहेत. मग टिकाऊ रस्त्याचं कोणतं असा धोरणात्मक बदल झालाय तो तर सवाल करत रस्ते कामांच्या दर्जाबाबत जोरदार टिका केली.


मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पावर भाषण करताना मनसे अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी स्थायी समिती अध्यक्षांच्या भाषणावर प्रश्नचिन्ह उपस्थित घेत प्रशासनाच्या कारभाराचा समाचार घेतला. किल्लेदार यांनी असे कामगारांची रिक्त पदे आणि भरतीबाबत बोलतांना स्थायी समितीच्या अखत्यारित येणाऱ्या महापालिका सचिव आणि लेखा परिक्षण विभागातील रिक्तपदे भरण्यासाठी अध्यक्षांनी आपल्या स्तरावर निर्णय घेऊन भरती करावी. त्यानंतर आपण प्रशासनाला इतर खात्यांसंदर्भात भरती करण्याबाबत सांगू शकतात,असे त्यांनी सांगितले.


आपण मराठी शाळा टिकवण्यासाठी आणि मराठी शाळा वाढवण्यासाठी काही ठोस उपाययोजना करून प्रशासनाला या माध्यमातून निर्देश दिले असते, तर आम्हाला ते बरे वाटले असते. पण इथे आमची उपेक्षा झालेली आहे. किमान मराठी शाळा टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी ठोस कार्यक्रम जाहीर कराल आणि यासाठी पुढाकार घ्याल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


अनधिकृत बांधकामांचा समाचार घेताना अनधिकृत बांधकामे आहेत ती हटवण्याबाबत प्रशासनाने ठोस पाऊल टाकायलाच हवे. आपल्या हाती महापालिकेची सत्ता दिली आणि प्रशासन आपल्या हाती आहे. नाल्याच्या शेजारी असलेली अनधिकृत बांधकामे हटवणं किंबहुना मुंबईतील इतर बांधकाम हटवणं या सर्व बाबी महापालिकेच्या नित्यनेमानी येणाऱ्या कामकाजाचा भाग आहे . त्या हटवल्या गेल्याच पाहिजे,असे त्यांनी सांगितले.


मुंबईतील सर्व मार्केटचा पुनर्विकास जेव्हा होईल, तेव्हा होईल किंबहुना त्यामध्ये काही अडचणी असतील तर त्या सर्वप्रथम सोडवून सध्या जे गाळेधारक आहेत आणि जे तिथे व्यवसाय करत आहेत. त्यांना सुविधा देणे हे आपलं बंधनकारक कर्तव्य आहे. त्यामुळे या सर्व मार्केटच्या तात्पुरत्या स्वरूपात का होईना दुरुस्ती करा अशी मागणी किल्लेदार यांनी केली. यासाठी जो निधी लागेल तो खर्च करा. तसेच जर एखादी वास्तु पुनर्विकासासाठी गेली असेल आणि त्यांचा विकास रखडला नसेल तर त्या वास्तूवरील होणारा खर्च संबंधित विकासकाकडून वसूल करावा,अशीही सूचनाही किल्लेदार यांनी केली.


मुंबई महापालिकेची फेरीवाल्यांवरील कारवाई एका सूडबुद्धीने चालली आहे, असे सांगत किल्लेदार यांनी आम्ही फेरीवाल्यांवर कारवाई करू नका असे मुळीच म्हणत नाही. पण जे फेरीवाले तीन ते चार पिढ्या परंपरागत व्यवसाय करतात. त्यांना तरी कुठेतरी संरक्षण द्या, हीच आमची मागणी आहे. तसेच आणि न्यायालयाच्या निर्देशानुसार रेल्वे स्थानकापासून १५० मीटरच्या परिसरात जे फेरीवाले आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यास कुणीच रोखत नाही, पण त्यापुढील फेरीवाल्यांना का त्रास दिला जातो असाही सवाल किल्लेदार यांनी केला.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने