प्रत्येक उद्यानांमध्ये बोअरवेल खोदण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

मुंबई : मुंबईमधील महानगरपालिकेच्या सर्व विद्यमान उद्यानांमध्ये व उद्यानांचा विकास करुन नव्याने तयार करण्यात येणाऱ्या सर्व उद्यानांमध्ये कुपनलिका (बोरवेलची) खोदण्याची मागणी केली जात आहे. मुंबईतील भविष्यातील पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर ही मागणी आता जोर धरु लागली आहे. उद्यानांच्या दैनंदिन देखभालीसाठी पुरेशा पाणी पुरवठयाची कायमस्वरुपी स्त्रोत म्हणून या विहिरींचे बांधकाम केले जावे अशी मागणी होत आहे.


मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ सईदा खान यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे ही मागणी केलीआहे. आपल्या ठरावाच्या सूचनेमध्ये त्यांनी मुंबई महानगरपालिकेची जी जी उद्याने आहेत, हया उद्यानात सकाळ-संध्याकाळ नागरिक चालण्यासाठी येतात, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा कट्ट्यावर बसण्यासाठी येतात व लहान मुलेही खेळण्यासाठी येतात. शाळांना सुट्टया पडल्या की सदर उद्यानांमध्ये जास्त गर्दी पहावयास मिळते,असे नमुद केले.


उद्यानांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय तसेच उद्यानांमधील हिरवळ (गवत) व शोभेची झाडे, वेली वर्षभर विशेषतः उन्हाळयात टवटवीत ठेवण्यासाठी नियमित आणि पुरेशा दररोज हजारो लिटर पाणीपुरवठयाची गरज असते. परंतु शहरामध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा मूळातच मर्यादित असतो किंवा अनेकदा पाणीपुरवठयात कपातही केली जाते. तसेच, टँकरद्वारे पाणी मागवणे महापालिकेसाठी खर्चिक बाब आहे. त्यामुळे उद्यानाचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी व वृक्षसंपदेचे जतन करण्यासाठी कूपनलिका (बोअरवेल) ही आजच्या काळातील एक अनिवार्य गरज बनली आहे. त्यामुळे हिरवळीच्या शाश्वत संगोपनाचा एक महत्वाचा भाग म्हणून मुंबईमधील महानगरपालिकेच्या सर्व विद्यमान उद्यानांमध्ये व उद्यानांचा विकास करुन नव्याने तयार करण्यात येणाऱ्या सर्व उद्यानांमध्ये कुपनलिका (बोरवेलची) खोदण्याची मागणी डॉ सईदा खान यांनी केली आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने