Sangli Crime News : तमाशातील वाद, दारू प्रेमसंबंधांचा शेवट; २४ तासांत सांगलीत सलग तीन खुनांनी खळबळ

सांगली : सांगली जिल्ह्यात गेल्या २४ तासांत घडलेल्या तीन वेगवेगळ्या खुनांच्या घटनांनी कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. कवलापूर आणि कुपवाड परिसरात घडलेल्या या घटनांमागे किरकोळ वाद, दारूचे नशेत झालेले भांडण आणि प्रेमसंबंधातील तणाव अशी विविध कारणे समोर आली आहेत.



कवलापूरमध्ये तमाशा कार्यक्रमात वादातून खून


कवलापूर येथे यात्रेनिमित्त आयोजित तमाशा कार्यक्रमात पहिली घटना घडली. विश्वास कल्लाप्पा सुतार (वय ३२) हा तरुण कार्यक्रम पाहण्यासाठी आला होता. त्याचवेळी रोहित उर्फ नवनाथ नाईक हा देखील तेथे उपस्थित होता. गर्दीत झालेल्या धक्काबुक्कीमुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाला. दोघेही दारूच्या नशेत असल्याने वाद अधिक चिघळला. या वादातून रोहित उर्फ नवनाथ याने विश्वासच्या डोक्यात दगड मारून त्याचा खून केल्याची माहिती समोर आली आहे.



कुपवाडमध्ये दारू पिताना वाद; एकाचा खून


दुसरी घटना कुपवाड शहरात घडली. सचिन माने हा दारू पिण्यासाठी दुकानात गेला असताना त्याच्यासोबत पूर्वीपासून वाद असलेले दोन जण तेथे आले. त्यांच्यात वाद निर्माण झाला आणि त्याचे रूपांतर मारहाणीत झाले. या घटनेत दोघांनी सचिन माने याच्या डोक्यात दगड मारून त्याचा खून केला. घटनेनंतर आरोपी फरार झाले असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.



प्रेमसंबंधातून पत्नीनेच पतीचा घेतला जीव


तिसरी घटना कुपवाड एमआयडीसी परिसरात समोर आली. दगडू केंगार या बांधकाम कामगाराचा खून त्याच्या पत्नीने केल्याचे उघड झाले आहे. संबंधित महिलेला पोलिसांनी अटक केली असून, तिचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. या नात्याला पतीचा विरोध असल्याने दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. अखेर या तणावातूनच पत्नीने पतीचा खून केल्याची कबुली दिल्याची माहिती आहे.



पोलिस तपास आणि परिसरातील तणाव


सलग तीन खुनांच्या घटनांमुळे सांगली जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून सर्व घटनांचा सखोल तपास सुरू असून, फरार आरोपींचा शोध घेण्याचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत. तसेच कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.


छोट्याश्या कारणांवरून घडलेल्या या गंभीर घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पुढील काळात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी सांगली पोलिस यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण