Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers) आदेश जारी केले आहेत. यामध्ये पुणे, नाशिक आणि जळगावसह मंत्रालयातील महत्त्वाच्या विभागांमधील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.


महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे (पुणे) व्यवस्थापकीय संचालक राहुल रंजन महिवाल यांची बदली आता महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या सदस्य सचिवपदी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी रुचेश जयवंशी यांची शेती महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाली आहे. तसेच, नाशिक महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांची जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी वर्णी लागली असून, त्यांच्या रिक्त जागी अमित रंजन (प्रकल्प अधिकारी, पांढरकवडा) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Transfers Of IAS Officers)


राज्याच्या दिल्लीतील प्रशासकीय कामकाजाची जबाबदारी असलेल्या 'महाराष्ट्र सदन'च्या (Transfers Of IAS Officers) विशेष निवासी आयुक्तपदी श्वेता सिंघल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कान्हूराज बगाटे महावितरणच्या कल्याण विभागात संयुक्त व्यवस्थापकीय संचालक पदाची धुरा सांभाळतील. लक्ष्मण राऊत यांची महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी काम पाहतील.


मंत्रालयातील नियोजन विभागात गीतांजली बाविस्कर यांची सहसचिव म्हणून बदली (Transfers Of IAS Officers) झाली आहे, तर डॉ. दिलीप जगदाळे आता पाणीपुरवठा व स्वच्छता विभागात सहसचिव म्हणून काम पाहतील. जळगाव जिल्हा परिषदेच्या सीईओ मीनल करणवाल यांची आता मुंबईतील महत्त्वाकांक्षी 'पोकरा' प्रकल्पाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. करिश्मा नायर जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, तर अमित रंजन नाशिक महापालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त म्हणून पदभार सांभाळतील.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा