Ahmedabad Toodler Death : डोशाच विषारी पीठ की जाणीवपूर्व केलेला विषप्रयोग ? पोलिसांचा संशय बळावला

अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमधील चांदखेडा येथे झालेल्या दुहेरी मृत्यूने सर्वाना धक्का बसला आहे. एकाच कुटुंबातील दोन चिमुरड्या बहिणींचा मृत्यू झाल्याचे सगळीकडे खळबळ उडाली आहे. निमित्त ठरल बाहेरून आणलेले डोशाच पीठ. आईने डोसे केले घरात सर्वानी ते खाल्ले आणि त्याच डोश्यानी त्यांना मृत्यूच्या दाढेत ढकलले, परंतु पोलिसांना मृत्यूचे वेगळेच धागेदोरे सापडले असून यातून अनेक खुलासे बाहेर येण्याची शक्यता आहे.



नेमकं घडलं काय ?


१ एप्रिलला मुलींचे वडील विमल प्रजापती यांनी डेअरीतून डोशाच पीठ आणल. त्याच दिवशी त्यांनी रात्री डोसे करून खाल्ले. त्यानंतर त्यांची तब्बेत बिघडली परंतु प्राथमिक उपचार घेत ते बरे देखील झाले, पण पुन्हा ३ आणि ४ एप्रिलला त्यांना त्रास जाणवू लागला, मुलींना उलट्या झाल्या, प्रकृती झपाट्याने खालावली, लहान मुलीला तीव्र झटके येऊ लागले म्हणून तिला रुग्णालयात दाखल केले, उपचारादरम्यान तिचा ४ एप्रिलला मृत्यू झाला. आणि ५ एप्रिलला मिश्रीचा मृत्यू झाला.



दोन शक्यता वर्तवण्यात येत आहेत


१. पीठ नासले म्हणून 


डेअरी मालक केतन पटेल यांच्या सांगण्यानुसार ते सारखेच पीठ त्याने जवळपास २०० लोकांना दिले, शिवाय आमच्या कुटुंबाने देखील खाल्ले त्यापैकी एकाचीही अशी कोणतीच तक्रार आली नाही. कुटुंबाने रात्री डोसे करून पुन्हा दुसऱ्या दिवशी त्या पिठाचे डोसे खाल्ले तेव्हा ते पीठ नासले असण्याची शक्यता असून ते खाल्ल्यामुळे चिमुरडीचा मृत्यू झाला असावा




२. विषबाधा केल्याचा संशय


कारण ३ महिन्यांची राहा केवळ आईचे दूध पीत असल्याने तिने डोसा खाल्ल्याची शक्यात तर मुळीच नाही, तरीही तिची प्रकृती खालावली, जर स्तनपानामुळे तिच्यावर परिणाम झाला असेल तर तिच्या आईची प्रकृती देखील गंभीर असली असती. परंतु आई वडिलांची प्रकृती ही चिंताजनक नसल्याने
या विषयाला अनेक फाटे फुकट आहेत.


डेअरीमधून ३ किलो पीठ खरेदी करण्यात आले, परंतु त्यातील केवळ छोटासा भाग खाण्यात आला, ज्यामुळे तपासात आणखी गुंतागुंत निर्माण झाली आहे .


दरम्यान अपघाती मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून विविध बाजूनी तपासा सुरु आहे, आता पुढील निष्कर्ष न्यायवैद्क अहवालावर अवलंबून आहे. असे पोलीस निरीक्षकांनी स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

School Bus Fire : उन्नावमध्ये शालेय बसला भीषण आग! 60 विद्यार्थी थोडक्यात बचावले; महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

उन्नाव : उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे लखनौ-कानपूर महामार्गावर शुक्रवारी संध्याकाळी शालेय विद्यार्थ्यांना घेऊन

संपत्तीच्या वादात माणुसकी हरवली ! 3 दिवस घरातच पडून राहिला वृद्धाचा मृतदेह, अखेर...

पैसा, संपत्ती आणि मालमत्तेच्या हव्यासापोटी माणुसकी हरवत चालल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. तेलंगणातील एका

Andhra Pradesh Temple : नवरात्रीत देवीची अनोखी सजावट! तब्बल 4.42 कोटींच्या नोटांनी मंदिर सजवलं; पाहून व्हाल थक्क!

आंध्र प्रदेशातील अमलापूरम येथील श्री वासवी कन्यका परमेश्वरी अम्मावरू मंदिर सध्या आपल्या अनोख्या सजावटीमुळे

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी रुग्णालयात दाखल; छातीत संसर्ग, प्रकृती स्थिर

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना छातीत संसर्ग झाल्याने दिल्लीतील अपोलो

Saudi Arabia Flight Update : सौदी अरेबियासाठी विमानसेवा रद्द! IndiGo आणि Akasa Air चा मोठा निर्णय; प्रवाशांनी लक्ष द्या

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढत्या तणाव आणि सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, इंडिगो आणि अकासा एअर या

Weather Alert: हवामानाचा मोठा इशारा! उद्या 16 राज्यांत पावसाचा रेड अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

देश: हवामान विभागाने पुन्हा एकदा 16 राज्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 17