LED fishing boats will be cancelled : एलईडी मासेमारी बोटींना डिझेल पुरवठा करणाऱ्या मच्छिमार संस्थांची नोंदणी रद्द करणार

मंत्री नितेश राणे यांचा इशारा; पारंपरिक मच्छिमारांना त्रास देणाऱ्यांची खैर नाही


मुंबई : राज्यात एलईडी मासेमारीवर अधिकृत बंदी असतानाही नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात आता राज्य सरकारने कठोर पवित्रा घेतला आहे. एलईडी मासेमारी करणाऱ्या बोटींना डिझेलचा पुरवठा करणाऱ्या मच्छिमार संस्थांना आम्ही हेरले असून, अशा संस्थांची नोंदणी आणि परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाईल, असा इशारा राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी बुधवारी दिला.


अलिबागच्या आक्षी-साखर येथे ग्रोयान्स बंधारा, जेट्टी, पोहोच रस्ता बांधकाम आणि नौकानयन मार्गातील गाळ काढण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. या प्रसंगी आमदार महेंद्र दळवी, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर उपस्थित होते.


अलीकडच्या काळात एलईडी मासेमारी बोटींवर केलेल्या धडक कारवाईबाबत विचारले असता राणे म्हणाले, "पारंपरिक मच्छिमारांच्या हक्कावर गदा आणणाऱ्यांची गय केली जाणार नाही. ही तर केवळ सुरुवात आहे. एलईडी मासेमारीमुळे आमच्या पारंपरिक मच्छिमारांचे अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे कारवाई करूनही जर कोणी 'मस्ती' करणार असेल, तर त्यांनी आपल्या बोटी विसरून जावे. अशा बोटींवरून जप्त केलेले सर्व साहित्य आम्ही पूर्णपणे नष्ट करून टाकू", असा इशारा त्यांनी दिला.


डिझेल पुरवणारे रडारवर


अवैध मासेमारी करणाऱ्या बोटींना रसद पुरवणाऱ्या मश्चिमार संस्थांना इशारा देताना मंत्री राणे म्हणाले की, "एलईडी मासेमारी करणाऱ्या बोटींना डिझेलचा पुरवठा काही मच्छिमार संस्थांकडून केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. या संस्थांमुळेच बंदी असूनही या बोटी समुद्रात शिरकाव करू शकतात. त्यामुळे अशा संस्थांचे रजिस्ट्रेशन रद्द करण्याच्या सूचना दिल्या आहेत. भविष्यात कोणीही असे धाडस करणार नाही, याची खबरदारी मत्स्यव्यवसाय खाते घेईल."

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी