Raigad News : रायगड जिल्ह्यात नियम पूर्तता करणाऱ्या दगडखाणींना उत्खननाची परवानगी: महसूल मंत्री

मुंबई :  आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या खाणींना सरसकट बंदी न घालता उत्खननासाठी परवानगी द्यावी, मात्र कोणत्याही परिस्थितीत अवैध उत्खनन होणार नाही याची काटेकोर खबरदारी घ्यावी, असे स्पष्ट निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिले.


रायगड जिल्ह्यातील गौण खनिज उत्खनन अंतर्गत मौजे श्रीवर्धन मतदारसंघातील दगडखाणींसंदर्भात महसूलमंत्री दालनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, रायगडचे जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.


खाण मालकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता, ज्यांनी पर्यावरणीय परवानगीसाठी अर्ज केला आहे, त्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. अशा खाण मालकांकडून 'पुढील तीन महिन्यांच्या आत ही परवानगी मिळवू' असे प्रतिज्ञापत्र लिहून घेऊन त्यांना तात्पुरती उत्खनन परवानगी देण्याचे निर्देश मंत्र्यांनी दिले. तसेच शासनस्तरावर पर्यावरणीय परवानग्यांची प्रक्रिया अधिक वेगवान करण्याचे आदेशही त्यांनी दिले.


उत्खननाला परवानगी देतानाच महसूल मंत्र्यांनी प्रशासनाला अवैध प्रकारांबाबत सतर्क राहण्याचा इशारा दिला. "जेवढा परवाना दिला आहे, तेवढ्याच मर्यादेत उत्खनन होत आहे का, याची काटेकोर पडताळणी करावी. कोणत्याही परिस्थितीत अवैध उत्खनन होणार नाही, याची खबरदारी जिल्हा प्रशासनाने घ्यावी," असे मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने