Sunil Tatkare : महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभर विविध कार्यक्रमांनी साजरी करणार - सुनिल तटकरे

मुंबई : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची २०० वी जयंती व महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने राज्यभर कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली.


दिनांक ११ एप्रिल रोजी क्रांतीसूर्य महात्मा फुले यांची २०० वी जयंती तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल रोजी १३५ वी जयंती देशभर साजरी केली जाणार आहे. त्यामुळेच समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या मुल्यांवर उभ्या असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस या महामानवांचे कार्य व विचार घेऊन काम करत आहे. म्हणून पक्षाच्यावतीने राज्यभर संघटनात्मक पातळीवर प्रभावीपणे जयंती साजरी केली जाणार आहे.


प्रत्येक जिल्ह्यात पक्षाचे जिल्हाध्यक्ष महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक आहे त्याठिकाणी अभिवादन कार्यक्रम आयोजित करतील तर पक्षाच्या कार्यालयात दिनांक ११ एप्रिल रोजी महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात येईल तर १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा, तालुका, शहर व गाव स्तरावर अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात येतील.


महामानवांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांना उजाळा देण्यासाठी व्याख्यान, परिसंवाद, किंवा विचारमंथन कार्यक्रम आयोजित करण्यात यणार आहेत असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : सुट्या खाद्य तेलाच्या विक्रीस वर्षभराची मुदतवाढ; मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

पारंपरिक व्यावसायिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी समिती स्थापन करणार मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए)

Ashish Shelar : दहिसर 'ट्रान्सपोर्ट हब'च्या कामादरम्यान 'ब्लास्टिंग' नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करा!

- पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश; बाधित इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट, खनिज वाहतुकीची चौकशी करावी मुंबई : दहिसर

Devendra Fadnavis : मंत्री नितेश राणे, संग्राम जगताप, महेश लांडगे हे हिंदू नायक, त्यांनी पुढेही हिंदुत्वासाठीच काम केले पाहिजे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकोद्गार

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे, आमदार संग्राम जगताप आणि महेश लांडगे हे तिघेही हिंदू नायक असून

AndheriNews : वीरा देसाई रोड, जे.पी, रोड, आझाद नगरमधील आता तुंबणार पाण्यातून होणार सुटका

मोगरा नाल्यातील प्रवाह आता वळवणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) अंधेरी पश्चिम येथील वीरा देसाई रोड, जे.पी.रोड आणि आझाद

BMC : मोठ्या मंडळांसाठी समन्वय अधिकारी नेमा; समन्वय समितीची महापालिकेकडे मागणी!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत मोठ्याप्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात, अशा मंडळांसाठी महापालिकेने समन्वय

Malad Accident : "तिला मला शेवटचं पाहायचं आहे..."; जखमी पतीने व्हीलचेअरवरून घेतले पत्नीचे अखेरचे दर्शन

मुंबई : मालाडमध्ये रविवारी रात्री झालेल्या भीषण रस्ता अपघाताने एका कुटुंबावर मोठा आघात केला. या अपघातात ३४