Ashwini Bhide : रस्ते सिमेंटीकरण कामांना कोणतीही मुदतवाढ नाही

महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश


मुंबई (विशेष प्रतिनिधी)


महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्पाचा टप्पा १ दिनांक १२ डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात यावा. टप्पा २ हा मे २०२७ पर्यंत पूर्ण करावा. यामध्ये कोणत्याही स्वरुपाची मुदतवाढ दिली जाणार नाही. रस्ते गुणवत्तेबाबत अधिक दक्ष राहणे गरजेचे आहे. सध्या सुरू असलेल्या रस्त्यांची कामे ३१ मे २०२६ पर्यंत पूर्ण होतील, याची दक्षता घ्यावी. पावसाळादरम्यान कोणतेही काम सुरू केले जाणार नाही, याची काळजी घ्यावी. जेणेकरून नागरिकांना असुविधांचा सामना करावा लागणार नाही. सिमेंट रस्ता प्रकल्पात पारदर्शकता राहावी, यासाठी महानगरपालिकेने ‘डॅश बोर्ड’ सुरू केला आहे, असे भिडे यांनी सांगितले.


मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्पाच्या टप्पा १ आणि टप्पा २ अंतर्गत २,११८ रस्त्यांचे (लांबी ६९१.०८ किलोमीटर) सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. यापैकी १,१७० रस्त्यांचे (लांबी ३१६.८४ किलोमीटर) संपूर्ण लांबीचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. तर ५५९ रस्त्यांचे संगमस्थान ते संगमस्थान (१७१.४० किलोमीटर) सिमेंट काँक्रिटीकरण आहे. अशाप्रकारे एकूण ६९१.०८ किलोमीटर पैकी ४८८.२४ किलोमीटर अंतराच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण म्हणजेच ७१ टक्के काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित ३८९ रस्त्यांचे (१०२.०४ किलोमीटर) सिमेंट काँक्रिटीकरण लवकरच सुरू करण्यात येणार आहे.


मुंबई महानगरपालिकेकडून मुंबई महानगरातील पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी व्यापक स्वरुपात नियोजन केले जात आहे. मुंबईतील नागरिकांना खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध व्हावेत यासाठी रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्प दोन टप्प्यांमध्ये हाती घेतला आहे. त्यामुळे रस्ते प्रवास अधिक सुकर होणार आहे. एकिकडे महानगरपालिका रस्त्यांची कामे करत असताना, दुसरीकडे मुंबईकरांनाही आपल्या परिसरातील माहिती व्हावी यासाठी महानगरपालिकेने रस्त्यांची इत्यंभूत माहिती दर्शविणारी संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरील https://roads.mcgm.gov.in/publicdashboard या लिंकवर हा माहितीपूर्ण ‘डॅश बोर्ड’ सर्वांसाठी खुला आहे. विशेष म्हणजे हा ‘डॅश बोर्ड’ प्रत्येक दिवशी अपडेट करण्यात येणार आहे. महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी रस्ते कामांचा सविस्तर आढावा घेतला. रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे विहित वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने करण्यात यावीत, असे निर्देश अधिकाऱ्यांना आढावा बैठकीत त्यांनी दिले.


महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांच्या दालनात ही आढावा बैठक पार पडली. यावेळी अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, उप आयुक्त (पायाभूत सुविधा) गिरीश निकम, उप आयुक्त (आयुक्त कार्यालय) प्रशांत गायकवाड, प्रमुख अभियंता (रस्ते) मंतय्या स्वामी आदींसह अभियंते उपस्थित होते. मुंबईतील सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे गुणवत्तापूर्ण होण्यासाठी त्यात पारदर्शकता असणे गरजेचे आहे. त्यामुळे महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी या प्रकल्पाच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष दिले आहे.

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.