Metro-3 'Aqua Line' : मेट्रो-३ ‘अॅक्वा लाईन’चा प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार

मुंबई : मुंबईची नवी जीवनवाहिनी ठरणाऱ्या मेट्रो-३ म्हणजेच ‘अॅक्वा लाईन’ने मुंबईकर विद्यार्थी आणि पर्यटकांना एक मोठे गिफ्ट दिले आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (MMRC) प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ आणि खिशाला परवडणारा करण्यासाठी विशेष सवलतीच्या पासची घोषणा केली आहे. 'डिजिटल मोबिलिटी'ला चालना देण्यासाठी हे सर्व पास नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) वर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.



विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा खर्च आता २५ टक्क्यांनी कमी!


शाळा-महाविद्यालयाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मेट्रोने मोठा आधार दिला आहे. इयत्ता १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी खालीलप्रमाणे सवलत लागू असेल


४५ आणि ६० ट्रिप पासवर २५% थेट सवलत



वैधता: ३० दिवस.


यामुळे विद्यार्थ्यांचा दरमहा प्रवासाचा खर्च लक्षणीयरीत्या कमी होणार असून सुरक्षित आणि वातानुकूलित प्रवासाची खात्री मिळणार आहे.



पर्यटकांच्या सेवेसाठी ‘अनलिमिटेड’ मेट्रो राईड


मुंबई फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यकांसाठी मेट्रोने खास 'टुरिस्ट पास' सादर केले आहेत. एकदा पास काढला की कितीही वेळा प्रवास करण्याची मुभा मिळणार आहे:


१ दिवसाचा पास (अमर्यादित प्रवास): फक्त ₹२८०
३ दिवसांचा पास (अमर्यादित प्रवास): फक्त ₹७००



दिव्यांग आणि नियमित प्रवाशांनाही लाभ


केवळ विद्यार्थीच नव्हे, तर दिव्यांग प्रवाशांनाही ४५ आणि ६० ट्रिप पासवर २५% सवलत कायम ठेवण्यात आली आहे. तसेच, नियमित नोकरदार वर्गासाठी MetroConnect3 अॅपवर ४५ ट्रिपसाठी १०% आणि ६० ट्रिपसाठी १५% सवलत आता NCMC कार्डच्या माध्यमातून घेता येईल.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने