Minister Chhagan Bhujbal : मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून..... निफाड तालुक्यातील निमगाव वाकडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ३ कोटी ३८ लाखांच्या मुख्य इमारतीच्या बांधकामाला मंजुरी

निमगाव वाकडा प्राथमिक आरोग्य केंद्रास मिळणार सुसज्ज विस्तारीत इमारत....


येवला : राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून निफाड तालुक्यातील निमगाव वाकडा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ३ कोटी ३८ लाखांच्या मुख्य इमारतीच्या बांधकामाला जिल्हा वार्षिक योजनेमधून मंजुरी मिळाली असून लवकरच या कामाला सुरुवात होऊन वैद्यकीय सुविधा देण्यासाठी सुसज्ज इमारत मिळणार आहे.


निमगाव वाकडा येथे राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र ही इमारत लहान असल्याने रुग्णांना सेवा देण्यासाठी अपुरी पडणार होती. त्यादृष्टीने निमगाव वाकडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विस्तारित इमारतीसाठी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून आरोग्य विभागाकडे पाठपुरावा सुरू होता. त्यानुसार जिल्हा वार्षिक योजनेमधून या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, संबंधित निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्राची सुसज्ज व आधुनिक इमारत उभारण्यात येणार आहे. यामध्ये रुग्णांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे.


विशेष म्हणजे मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येथील वैद्यकिय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचे देखील काम सुरू असून हे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. निमगाव वाकडा प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरातील तीन गावांच्या सीमा असल्याने मोठ्याप्रमाणात उपचार घेण्यासाठी रुग्ण या प्राथमिक आरोग्य केंद्रात येतात. त्यादृष्टीने मंत्री छगन भुजबळ यांच्या कडून याठिकाणी आरोग्य सेवांचे बळकटीकरण करण्यात येत आहे.


सदर आरोग्य केंद्राच्या विस्तारीकरणामुळे निमगाव वाकडा तसेच परिसरातील नागरिकांना दर्जेदार व तात्काळ आरोग्य सेवा मिळणार आहेत. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा सक्षम करण्याच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या कामाची अंमलबजावणी करण्यात येणार असून, दर्जेदार व पारदर्शक पद्धतीने बांधकाम पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे.



प्रतिक्रिया....


मंत्री छगन भुजबळ यांनी येवला मतदारसंघातील ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले असून, त्यातूनच हा निधी मंजूर झाला आहे. या कामामुळे परिसरातील नागरिकांना थेट लाभ होणार आहे. चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहे.


Comments
Add Comment

Maharashtra Weather Update: मुंबई-ठाण्यात उष्णतेचा इशारा; कोकणासह देशातील अनेक भागांत पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update: देशातून नैऋत्य मान्सूनने पूर्णपणे माघार घेतली असली, तरी देशातील हवामानातील बदल सुरूच आहेत. बंगालचा

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी