BMC : स्वच्छतेबाबत महापालिकेचा वॉर रुम; महापालिका आयुक्तांनी दिले निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी)


मुंबईत स्वच्छतेसंदर्भातील कामकाज प्रभावीपणे होत असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी मध्यवर्ती नियंत्रण कक्ष (वॉर रुम) स्थापन करावे. तसेच, स्थानिक स्तरावर योग्यप्रकारे स्वच्छता होत असल्याची खात्री करण्यासाठी संबंधित प्रशासकीय विभागांच्या सहायक आयुक्तांनी नियमितपणे क्षेत्र भेटी द्याव्यात, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिले आहेत.


घनकचरा व्यवस्थापन विभागाचे विविध प्रकल्प, उपक्रम आणि कामकाजाचा आढावा महानगरपालिका मुख्यालयात आयोजित बैठकीत गुरुवारी ०९ एप्रिल २०२६ रोजी घेण्यात आला. यावेळी उप आयुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) प्रशांत गायकवाड, उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर, संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.


महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे पुढे म्हणाल्या, स्वच्छता ही नियमित प्रक्रिया आहे. त्यामुळे, ती नियमितपणे तितक्याच प्रभावीपणे होणे आवश्यक आहे. मुंबईतील सागरी किनारी रस्ता, महामार्गांवर सूक्ष्म पद्धतीने स्वच्छता व्हायला हवी. रस्त्यांवर वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे, याठिकाणी यांत्रिकी पद्धतीने स्वच्छता करण्यासाठी स्वतंत्र वाहने हवीत. या मार्गांवर स्वच्छतेसाठी आवश्यक असणाऱ्या विविध बाबी अंतर्भूत असणारी विशेष वाहने (कस्टमाईज्ड व्हेईकल) तयार करण्यासाठी उत्तम संस्थांची मदत घ्यावी. काही वर्दळीची ठिकाणे स्वच्छतेच्या दृष्टीने उत्तम बनवावीत आणि मग तिथे तशीच स्वच्छता कायम राहील, यासाठी नागरिकांना जागरुक करावे, असेही त्यांनी सांगितले.



दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा विभाग अंतर्गत कचरा संकलनासाठी आणलेल्या अद्ययावत वाहनांपैकी दहा टक्के वाहने ही इलेक्टॉनिक (ई-व्हेईकल) आहेत. घनकचरा संकलनाच्या कामासाठी मोठ्या क्षमतेची इतक्या मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक वाहने वापरणारी महानगरपालिका ही देशातील पहिलीच महानगरपालिका आहे, असेही आश्विनी भिडे यांनी यावेळी सांगितले. तसेच, स्वच्छतेप्रती नागरिकांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी महानगरपालिकेकडून आयोजित ‘मुंबई क्लीन लीग’ या स्पर्धेत नागरिक तसेच आस्थापनांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.


यावेळी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे विविध प्रकल्प, उपकरण, कामकाज आदींबाबत उप आयुक्त श्री. किरण दिघावकर यांनी सविस्तर सादरीकरण केले. यावेळी ते म्हणाले की, सध्या महानगरपालिकेच्या वतीने मुंबईतून सुमारे ७२०० मेट्रिक टन घनकचरा संकलित करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. संपूर्ण मुंबईत उत्तमप्रकारे स्वच्छता राखण्यासाठी सेवा आधारित (सर्व्हिस बेस्ड) कंत्राट पद्धती अवलंबण्यात आली आहे. तसेच, घनकचरा संकलन व वहनाच्या अनुषंगाने नवीन वाहने आणली आहेत. पूर्वी यासाठी १ हजार १९६ वाहने कार्यरत होती. पण, नव्याने आलेल्या वाहनांमध्ये क्षमतावृद्धी केल्याने आता या वाहनांची सख्या ९८८ वर आली आहे. तसेच, त्यांची रंगसंगतीही बदलण्यात आली आहे. मुंबईत ४६ ठिकाणी सुका कचरा विलगीकरण केंद्र आहेत. तर, ९४ वाहने यासाठी पूर्णवेळ कार्यरत आहेत. घरगुती काळजीयोग्य कचरा (डोमेस्टिक सॅनिटरी वेस्ट) संकलनासाठी महानगरपालिकेकडून विशेष सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेचा लाभ अनेक आस्थापनांकडून प्रभावीपीणे घेतला जात आहे, अशी माहितीही दिघावकर यांनी दिली.

Comments

विजय शिवराम सकपाळ    April 10, 2026 05:34 AM

सस्नेह नमस्कार. अभिनंदन, चांगली सुरुवात. घनकचरा विभागात काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिल्यास अतिउत्तम होईल. लोकसहभाग, सामाजिक सहकार्य घेणे आवश्यक आहे. परंतू आपणाकडून नागरिकांना योग्य प्रतिसाद मिळत नाही. त्यादृष्टीने योग्य विचार,नियोजन केल्यास चांगले परिणाम दिसून येतील. प्रशासनावरचा ताण काही प्रमाणात कमी होईल. माझी मुंबई स्वच्छ, हरित मुंबई. धन्यवाद.

Add Comment

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन

BMC Tankers : मुंबई महापालिकेच्यातीबतीने आणखी २२ टँकरची खरेदी, आता मुंबईत धावणार महापालिकेचे आणखी टँकर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता १० टक्के पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय

Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील सर्व अनधिकृत झोपड्या तोडा, स्थायी समिती अध्यक्षाचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता आता करण्यात येणार असून याबाबतचा

BMC Versova Project : वर्सोवा मलजल प्रक्रिया केंद्राच्या कामाला मार्च २०२७ ची डेडलाईन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरातील पर्यावरण संरक्षण आणि किनारपट्टीच्या पाण्याचा दर्जा सुधारण्याच्या