Ashok Kharat : भोंदू अशोक खरात प्रकरणात १६० जीबी डिजिटल डेटा जप्त

नाशिक : नाशिकमध्ये चर्चेत असलेल्या स्वयंघोषित कॅप्टन भोंदू अशोक खरात प्रकरणात नवे धक्कादायक प्रकरणे समोर येत आहेत. तपास यंत्रणांनी तब्बल १६० जीबी इतका डिजिटल डेटा जप्त केला असून, या पुराव्यांमुळे प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे. फॉरेन्सिक तपास पूर्ण झाल्यानंतर संबंधित अहवाल विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) सादर करण्यात आला आहे. या नव्या पुराव्यांमुळे अशोक खरात यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


तपासादरम्यान विविध डिजिटल उपकरणांतून मोठ्या प्रमाणावर माहिती मिळाली आहे. तीन पेन ड्राइव्हमधील ३२ जीबी डेटा, त्यामधील १९ स्वतंत्र फोल्डर्स, ६४ जीबी क्षमतेचा ओटीजी पेन ड्राइव्ह तसेच एक लॅपटॉप यांची तपासणी करण्यात आली. या सर्व उपकरणांतील माहिती सायबर आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून सखोल तपासली जात असून, एकूण १६० जीबीपेक्षा अधिक डेटा तपास यंत्रणांच्या हाती लागला आहे.या डिजिटल पुराव्यांमधून नोव्हेंबर २०२३ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत घडलेल्या घटनांचा तपशील उघड झाला आहे. विशेषतः कॅनडा कॉर्नर परिसरातील कार्यालयातून जप्त केलेल्या माहितीमुळे अनेक बाबी स्पष्ट होत आहेत. तपास यंत्रणांनी प्रत्येक पुराव्याचे ‘ए’, ‘बी’ आणि ‘बी’ अशा कोडमध्ये वर्गीकरण केले असून, ‘ए’ गटातील माहिती अत्यंत संवेदनशील असल्याचे समोर आले आहे. याशिवाय, या प्रकरणात साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले असून न्यायालयात सादर करण्यासाठी पुरावे व्यवस्थित गोळा केले जात आहेत. डिजिटल माहिती आणि साक्षीदारांच्या जबाबांमुळे तपास अधिक मजबूत झाला आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी नवे पैल समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


दरम्यान, या प्रकरणातील तिसऱ्या गुन्ह्यात अशोक खरात यांना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सुनावणीदरम्यान काही गंभीर आरोप मांडण्यात आले. एका प्रकरणात पीडितेला विशिष्ट आश्वासन देऊन फसवणूक केल्याचा आरोप वकिलांनी केला. या पार्श्वभूमीवर तपासासाठी अधिक वेळ देत न्यायालयाने पोलिस कोठडी मंजूर केली. एकूणच, डिजिटल पुरावे, फॉरेन्सिक अहवाल आणि साक्षीदारांचे जबाब यामुळे अशोक खरात प्रकरण निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहे. तपास यंत्रणा आता या सर्व पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई करत असून, येत्या काळात आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे.
Comments
Add Comment

School Bus Fire : उन्नावमध्ये शालेय बसला भीषण आग! 60 विद्यार्थी थोडक्यात बचावले; महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

उन्नाव : उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे लखनौ-कानपूर महामार्गावर शुक्रवारी संध्याकाळी शालेय विद्यार्थ्यांना घेऊन

Tesla Roadster : हवेत उडणारी कार खरंच बाजारात येणार ? टेस्लाची नवी Roadster चर्चेत, पण...

Tesla Roadster : जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्लाची (Tesla) नवी रोडस्टर कार सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या

संपत्तीच्या वादात माणुसकी हरवली ! 3 दिवस घरातच पडून राहिला वृद्धाचा मृतदेह, अखेर...

पैसा, संपत्ती आणि मालमत्तेच्या हव्यासापोटी माणुसकी हरवत चालल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. तेलंगणातील एका

Andhra Pradesh Temple : नवरात्रीत देवीची अनोखी सजावट! तब्बल 4.42 कोटींच्या नोटांनी मंदिर सजवलं; पाहून व्हाल थक्क!

आंध्र प्रदेशातील अमलापूरम येथील श्री वासवी कन्यका परमेश्वरी अम्मावरू मंदिर सध्या आपल्या अनोख्या सजावटीमुळे

पुण्यात भरधाव कारचा थरार! एमआयटी कॉलेज रोडवर 3 ते 4 दुचाकींना धडक; 24 वर्षीय चालक पोलिसांच्या ताब्यात

पुणे : पुण्यातील कोथरूड परिसरात भरधाव कारने अनेक दुचाकींना धडक दिल्याची घटना समोर आली आहे. एमआयटी

Pune Weather : उकाड्यापाठोपाठ पुण्यात पुन्हा मुसळधार पावसाची एन्ट्री; हवामान विभागाकडून 'यलो अलर्ट' जारी

पुणे : गेल्या काही दिवसांपासून वाढलेली ऑक्टोबर हीट आणि प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांसाठी एक