IPL 2026 Points Table : १५ सामन्यांनंतर राजस्थान रॉयल्स टॉपवर; हे ४ संघ प्लेऑफच्या रेसमध्ये आघाडीवर

मुंबई : आयपीएल २०२६ मध्ये आतापर्यंत १५ सामने पूर्ण झाले असून स्पर्धा आता रंगात आली आहे. काही संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत, तर काही अजूनही आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात आहेत. अशातच प्लेऑफच्या शर्यतीत कोण पुढे आणि कोण मागे, यावर नजर टाकूया.



टॉपवर राजस्थान रॉयल्सचा दबदबा :


सध्या राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) हा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. त्यांनी खेळलेल्या तिन्ही सामन्यांत विजय मिळवत ६ गुणांसह ते अव्वल स्थानी जाऊन बसले आहेत. त्यांचा नेट रन रेटही उत्तम आहे. तर पंजाब किंग्स (Punjab Kings) संघ दुसऱ्या स्थानावर असून त्यांनी २ विजय मिळवले आहेत, तर एक सामना पावसामुळे रद्द झाला. त्यांच्या खात्यात एकूण ५ गुण आहेत.


तर किंग कोहलीच्या बंगळुरूने (Royal Challengers Bengaluru) खेळलेल्या दोन्ही सामन्यांत विजय मिळवत तिसरे स्थान पटकावले आहे. त्यांचा रन रेटही सकारात्मक आहे. आणि या पॉईंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) हा सांग आहे.



टॉप-4 च्या बाहेरची चुरस :


पाचव्या स्थानावर लखनऊ (Lucknow Super Giants) आहे. लखनऊ संघाने आतापर्यंत ३ पैकी २ सामने जिंकले आहेत. हैद्राबादनेही २ सामन्यात विजय मिळवला असला तरी त्यांच्या कमी नेट रन रेटमुळे ते सहाव्या स्थानावर आहेत. सातव्या क्रमांकावर गुजरात असून मुंबई इंडियन्स आठव्या अथनावर आहे. मुंबईने (Mumbai Indians) फक्त एकच विजय मिळवला आहे. तर गुजरातने ३ पैकी १ सामना जिंकला आहे.



अजून खाते न उघडलेले संघ :


कोलकाता संघाने ४ सामने खेळले तरी विजय मिळवलेला नाही, त्यामुळे ते नवव्या स्थानावर आहेत. तसेच महेंद्र सिंह धोनीचा चेन्नई संघही अजूनही आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत असून गुणतालिकेत शेवटच्या म्हणजे दहाव्या स्थानावर आहे.



प्लेऑफची शर्यत :


सध्याच्या स्थितीनुसार राजस्थान, पंजाब, बंगळुरू आणि दिल्ली हे चार संघ प्लेऑफच्या शर्यतीत आघाडीवर दिसत आहेत. दुसरीकडे कोलकाता (Kolkata Knight Riders) आणि चेन्नई (Chennai Super Kings) यांच्यासाठी पुढील वाट खडतर आहे. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांना पुढील सामन्यांत दमदार पुनरागमन करणे अत्यावश्यक आहे.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून