Justice Yashwant Verma : जस्टिस यशवंत वर्मांनी दिला राजीनामा, घरात सापडलेल्या जळालेल्या नोटा

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. न्यायमूर्ती वर्मा यांनी आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला असल्याची माहिती समोर आली आहे. मार्च २०२५ मध्ये त्यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जळलेली आढळल्याच्या न्यायमूर्ती वर्मा देशभरात चर्चेचा विषय ठरले होते.


न्यायमूर्ती वर्मा दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असताना १४ मार्च २०२५ रोजी त्यांच्या दिल्लीतील सरकारी निवासस्थानी आग लागली होती. आग विझवण्यासाठी आलेल्या अग्निशमन दलाला त्यांच्या घरातील स्टोअर रूममध्ये जळालेल्या नोटांच्या मोठ्या गड्ड्या आढळून आल्या होत्या. त्या वेळी न्यायमूर्ती वर्मा घरी उपस्थित नव्हते; ते मध्य प्रदेशात होते.



ही घटना समोर आल्यानंतर तत्कालीन सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय अंतर्गत समिती स्थापन केली होती. समितीच्या अहवालात प्राथमिक स्तरावर आरोपांमध्ये तथ्य असल्याचे नमूद करण्यात आले होते.यानंतर सरन्यायमूर्तींनी न्या. वर्मा यांना राजीनामा देण्याचा सल्ला दिला होता, मात्र त्यांनी राजीनामा दिला नव्हता. त्यानंतर त्यांचे न्यायिक कामकाज काढून घेण्यात आले आणि त्यांची बदली अलाहाबाद उच्च न्यायालयात करण्यात आली. अंतर्गत चौकशी अहवाल राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना पाठवण्यात आला होता. त्यानंतर लोकसभेतील १४६ खासदारांनी त्यांना पदावरून हटवण्याचा प्रस्ताव लोकसभा अध्यक्षांकडे सादर केला होता. हा प्रस्ताव स्वीकारून पुढील चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली होती.

Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि