Nick Jonas : बॉलिवूडच्या गाण्याची निक जोनसला भूरळ, पत्नी प्रियांका नव्हे तर माधुरीच्या 'या' प्रसिद्ध गाण्यावर थिरकला

मुंबई : भारतीय सिनेसृष्टी जगभरात प्रसिद्ध असून बॉलिवूडच्या सिनेमांसोबतच गाण्यांनाही जगभरात पंसती मिळते. यापैकीच बॉलिवूडचा चाहता असलेला अमेरिकन पॉप स्टार आणि बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राचा नवरा निक जोनस यानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.


या व्हिडिओमध्ये निक त्याची पत्नी प्रियांका चोप्रा आणि त्याच्या भावांसोबत बॉलिवूड गाण्यांवर नाचताना दिसत आहे. मात्र, यामध्ये निक प्रियांका नाही तर अभिनेत्री माधुरी दिक्षितच्या गाण्यावर थिरकत आहे.


या व्हिडिओत 'पुकार' सिनेमातील 'के सरा सरा' हे प्रसिद्ध गाणं वाजत आहे, जे माधुरी दीक्षित आणि प्रभू देवा यांच्यावर चित्रित करण्यात आलं होतं. निकनं या व्हिडिओला 'आपल्या हृदयाचे ऐका' असं कॅप्शन दिलं आहे.





निक जोनासचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून निकनं बॉलिवूड गाण्यांबद्दलचं आपलं प्रेम व्यक्त करण्याची ही पहिली वेळ नाहीये. याआधीही त्यानं एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये तो, त्याची पत्नी प्रियांका चोप्रा आणि त्याचे भाऊ केविन जोनास व जो जोनास 'कुर्बानी' सिनेमातील 'आप जैसा कोई' या हिट गाण्यावर नाचताना दिसत होते. या व्हिडिओमधील चौघांच्या उत्साहानं चाहत्यांचं पुरेपूर मनोरंजन केले.




अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनस सतत चर्चेत असतात. सध्या निकने शेअर केलेल्या या व्हिडिओनं भारतीय चाहत्यांची मने जिंकली आहेत.
Comments
Add Comment

Rajya Natya Spardha : राज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी अनुभवी कलाकारांना २५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धांना

Ranbali Movie Review : कागदावर धमाकेदार, पण पडद्यावर फिका? 'रणबाली' चित्रपट कसा आहे ?

साऊथचा लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडाच्या (Vijay Devarkonda) बाबतीत एकच गोष्ट वारंवार घडताना दिसते. त्याच्या एखाद्या

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या