Pune FDA Action : पुण्यात एफडीएची कारवाई; मावळमध्ये भेसळयुक्त आंबा पल्प जप्त

पुणे : उन्हाळ्यात नागरिकांना सुरक्षित अन्न मिळावे, यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान मावळ तालुक्यातील एका ठिकाणी भेसळयुक्त आंबा पल्प तयार केल्याचा प्रकार उघडकीस आला. या कारवाईत एकूण 2 लाख 23 हजार 196 रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला.



गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने संबंधित उत्पादन युनिटवर छापा टाकला. तपासणीदरम्यान आंबा पल्प तयार करताना अधिकृत नसलेले रंग व इतर भेसळीचे घटक वापरले जात असल्याचे आढळून आले. या ठिकाणाहून आंबा पल्प, आंबा फळ तसेच साखर, गायीचे दूध आणि द्रव केशरी रंग अशा घटकांसह एकूण सहा नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. या ठिकाणी साठवून ठेवलेला 3,282.9 किलो इतका 1 कोटी 61 लाख 816 किंमतीचा माल जप्त केला. नाशवंत स्वरूप लक्षात घेऊन हा साठा नष्ट करण्यात आला.


Comments
Add Comment

नाचणीची भाकरी, भाजी अन् बांधावरील गप्पा; ग्रामस्थांशी संवाद साधत पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले जलसंधारण चळवळीला बळ

सिंधुदुर्ग : दुष्काळी परिस्थितीचा सामना करताना पाण्याचा प्रत्येक थेंब अडविणे, जमिनीत जिरविणे आणि उपलब्ध

AstraZeneca Pharma India : जागतिक बाजारपेठेत भारतीय औषध उद्योगांची प्रभावी कामगिरी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : “अमेरिका आणि युरोपसारख्या नियंत्रित बाजारपेठांमध्ये भारतीय औषधे, विशेषतः जेनेरिक औषधे, प्रभावी कामगिरी

राज्यातील सर्व शाळांमध्ये राज्य सरकार राबवणार विशेष स्वच्छता मोहीम, साफसफाई आणि किरकोळ दुरुस्तीवर देण्यात येणार भर

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये विशेष स्वच्छता मोहिम राबवण्यात येणार आहे. स्वच्छता

Jalna Healthcare Project : जालन्यात कर्करोग, हृदयरोगांसह गंभीर आजारांवर उपचार; 3 हेक्टर जागेला मंजुरी

मुंबई : मराठवाड्यातील गोरगरीब रुग्णांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जालना येथील

नाशिकमधील दूषित पाणी प्रकरणाची NHRC कडून दखल; मुख्य सचिवांना दोन आठवड्यांत अहवाल देण्याचे निर्देश

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अंबड औद्योगिक परिसरालगत असलेल्या दत्तनगर भागातील बोअरवेलचे पाणी रासायनिक

Jalgaon : चाळीसगाव रेल्वे स्थानकाचा होणार कायापालट! पार्सल हब म्हणून विकसित करण्याची रेल्वेची तयारी

चाळीसगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील चाळीसगाव रेल्वे स्थानकाला आता पार्सल हब म्हणून विकसित करण्याची