Bmc News : वांद्र्यातील नवपाडा, घासबाजारमधील तुंबणाऱ्या पाण्याचा मार्ग मोकळा

दक्ष सहायक आयुक्तांमुळे रेल्वेला करावी लागली कल्व्हर्टची सफाई


मुंबई : मुंबईतील नालेसफाईच्या कामाला सुरुवात झालेली असून मोठ्या आणि छोट्या नाल्यांचा सफाईसह रेल्वेच्या हद्दीतील मोऱ्या अर्थात कल्व्हर्टची सफाईही होणे आवश्यक असते. रेल्वे हद्दीतील कल्व्हर्टच्या सफाईसाठी महापालिकेच्यावतीने रेल्वे प्रशासनाला कोट्यवधी रुपयांचा निधी दिला जातो. परंतु रेल्वेकडून योग्यप्रकारे कल्व्हर्टची सफाई होत नाही. अशाचप्रकारे रेल्वेला पैसे देवूनही त्यांच्याकडून वांद्रे रेल्वे स्थानकाजवळील कल्व्हर्टची साफ न झाल्यामुळे वांद्रे पूर्व येथील नवपाडा, घासबाजार परिसरात पावसाचे पाणी तुंबले जायचे. मात्र, ही बाब एच पूर्व विभागाच्या दक्ष सहायक आयुक्त आणि त्यांच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात घेताच आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांच्या माध्यमातून रेल्वे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आणि मागील अनेक वर्षांपासून न झालेल्या कल्व्हर्टची अखेर मेगाब्लाॅक घेवून सफाई करून दिली.



मागील काही वर्षांपासून वांद्रे पूर्व भागातील नवपाडा आणि घास बाजार परिसरात पावसाचे पाणी तुंबण्याच्या घटना घडत होते. मात्र, या तुंबणाऱ्या पाण्याचे कारण एच पूर्व विभागाच्यावतीने शोध घेण्यात आला असता पश्चिम रेल्वेच्या गेट क्रमांक १८ जवळील कल्व्हर्ट २२ची सफाई मागील अनेक वर्षांपासून सफाई झाली नव्हती. त्यामुळे या परिसरात पाणी तुंबण्याचे प्रकार घडत होते. त्यामुळे रेल्वे कल्व्हर्टची सफाई न झाल्यामुळे हे पाणी तुंबत असल्याचे कारण समोर आल्यानंतर एच पूर्व विभागाच्या सहायक आयुक्त मृदूला अंडे यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी पाठपुरावा करून त्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यानंतरही त्यांच्याकडून टाळाटाळ केली जात असल्यामुळे अखेर अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांच्या लक्षात आणून ही बाब दिल्यानंतर त्यांनीही रेल्वेला याची कल्पना दिली. त्यानंतर पश्चिम रेल्वेने दोन दिवसांचा मेगाब्लॉक घेवून याची सफाई केली. त्यामुळे रेल्वे कल्व्हर्टची सफाई आणि महापालिकेच्या हद्दीतील त्यांना जोडणाऱ्या नाल्याची सफाईसुध्दा झाल्यामुळे यंद पावसाच्या पाण्याचा प्रवाह सुरळीत राखल जावून या परिसरात पाणी तुंबण्याच्या घटना घडणार नाही असा विश्वास व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे ही बाब एच -पूर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी शोधून रेल्वेकडून याची सफाई करून घेईपर्यंत पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या अधिकाऱ्यांना याची कल्पनाही नव्हती. त्यामुळे पर्जन्य जलवाहिनी विभागाचे अधिकारी काय काम करतात असा सवाल उपस्थित होत आहे.


वांद्रे रेल्वे स्थानकाजवळी कल्व्हर्टची सफाईची बाब सहायक आयुक्त मृदुला अंडे यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर रेल्वेने याची सफाई करून दिली आहे, अशाचप्रकारे प्रत्येक सहायक आयुक्तांकडून तसेच पर्जन्य जलवाहिनी विभागाकडून माहिती जाणून घेत रेल्वे कल्व्हर्टची सफाई केली जाईल. यामध्ये प्रत्येक विभागांमधील कल्व्हर्टच्या सफाई कामांचा आढावा घेऊन रेल्वेला याची सफाई करण्यासाठी योग्य ते निर्देश दिले जातील,असे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी स्पष्ट केले



रेल्वेच्या हद्दीतील नाल्यांची आणि त्यांच्या कल्व्हर्टची सफाई ही रेल्वेनेच करायची असून त्यासाठीचे पैसे महापालिका त्यांना देते. त्यामुळे महापालिका आपल्या हद्दीत नाल्यांची सफाई करत असली तरी रेल्वे जर आपल्या हद्दीतील नाल्यांच्या कल्व्हर्टची सफाई करत नसेल तर मग पाण्याचा प्रवाह रोखला जावून पाणी तुंबण्याचे प्रकार घडू शकतात. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी अशाप्रकारच्या घटना घडत असतील तर वॉर्ड ऑफीसने या बाबी आधीच निदर्शनास आणून द्यावे अशाप्रकारच्या सूचना केल्या होत्या. तसेच पावसाळ्यात पाणी तुंबल्यानंतर एकमेकांकडे बोट दाखवण्याऐवजी पावसाळ्यापूर्वीच त्याचे निवारण कसे होईल याकडे लक्ष देणे आवश्यक असून याबाबत लवकरच प्रशासनाच्या स्तरावर रेल्वेसोबतची समन्वय बैठक पार पडणार आहे. - अभिजित बांगर, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.