Earned Leave : कर्मचाऱ्यांना सुट्यांच्या बदल्यात मिळणार पैसे

नवी दिल्ली : देशातील लाखो नोकरदारांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या नव्या लेबर कोडमुळे आता न वापरलेल्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत, कारण त्या बदल्यात आता थेट पैसे मिळणार आहेत. हे नियम अद्याप पूर्णपणे लागू झालेले नसले तरी लवकरच लागू झाल्यास कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.


नव्या कामगार कायद्यांतर्गत, विशेषतः Occupational Safety, Health and Working Conditions (OSH) Code, २०२० अंतर्गत, देशभरात सुट्ट्यांचे एकसमान नियम लागू करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या विविध राज्यांमध्ये वेगवेगळे नियम लागू आहेत. त्यामुळे गोंधळ निर्माण होतो. हा गोंधळ दूर करून एकसंध प्रणाली लागू करण्याचा सरकारचा उद्देश आहे. या नव्या नियमांनुसार, कर्मचाऱ्याला प्रत्येक २० दिवसांच्या कामानंतर १ दिवसाची अर्न्ड लीव्ह (Earned Leave or EL) मिळणार आहे. याशिवाय, जास्तीत जास्त ३० दिवसांची सुट्टी पुढील वर्षासाठी राखून ठेवता येईल. मात्र, जर सुट्ट्या ३० दिवसांपेक्षा जास्त झाल्या, तर त्या सुट्ट्यांचे ‘एनकॅशमेंट’ म्हणजेच रोख रकमेत रूपांतर करता येणार आहे.


यातील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे, वर्षाच्या शेवटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या उरलेल्या सुट्ट्यांचा मोबदला मागण्याचा अधिकार मिळणार आहे. म्हणजेच, सुट्ट्या न वापरल्यास त्या थेट पैशात बदलता येणार आहेत. त्यामुळे सुट्ट्या ‘वाया’ जाण्याचा प्रश्नच राहणार नाही. याशिवाय, जर एखाद्या कर्मचाऱ्याने सुट्टीची मागणी केली आणि कंपनीने ती नाकारली, तरीही ती सुट्टी पुढे देण्यात यावी अशी तरतुद असेल. अशा प्रकारे साठवलेल्या सुट्ट्या ३० दिवसांपेक्षा जास्त झाल्यास त्या देखील एनकॅश करता येणार आहेत. यामुळे कंपन्यांच्या मनमानी कारभाराला काही प्रमाणात आळा बसणार आहे. हा फायदा प्रामुख्याने ‘वर्कर’ या श्रेणीतील कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. यात कॉन्ट्रॅक्ट आणि फिक्स्ड टर्म वर्कर्सचाही समावेश होतो. मात्र, व्यवस्थापकीय किंवा प्रशासकीय (administrative) पदांवरील तसेच १८,००० हजार रुपयांपेक्षा जास्त पगार असलेल्या सुपरवायझरला हे नियम लागू होणार नाहीत.


पूर्वी Shops and Establishment Act आणि Factories Act, १९४८ अंतर्गत प्रत्येक राज्यात वेगवेगळे नियम होते. काही ठिकाणी ४५ ते ६० दिवस सुट्ट्या साठवण्याची मुभा होती, तर काही ठिकाणी नियम वेगळे होते. आता नवीन लेबर कोडमुळे देशभर एकसमान नियम लागू होणार आहेत. सध्या हे नियम पूर्णपणे लागू झालेले नाहीत, कारण अनेक राज्यांनी अजून त्यांच्या अंमलबजावणीचे नियम फायनल केलेले नाहीत. सर्व राज्ये तयार झाल्यानंतरच हे नियम देशभर लागू होतील. एकूणच, नवीन लेबर कोडमुळे कर्मचाऱ्यांना सुट्ट्यांबाबत अधिक स्पष्टता आणि आर्थिक लाभ मिळणार आहे.

Comments
Add Comment

Nepal Flood : नेपाळमध्ये महापुराचा कहर! ६ जलविद्युत प्रकल्पांमध्ये ५०० हून अधिक जण अडकले; बचावकार्याला खराब हवामानाचा अडथळा

डेहराडून : नेपाळमध्ये आलेल्या भीषण आणि विनाशकारी पुरानंतर परिस्थिती अद्याप गंभीर आहे. फ्लॅश फ्लडचा सर्वाधिक

Chitrakoot Flood : चित्रकूटमध्ये मंदाकिनी नदीला महापूर; रामघाट परिसर पाण्याखाली, 200 जणांची सुटका

चित्रकूट : उत्तर प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यात मंदाकिनी नदीला आलेल्या मोठ्या पुरामुळे परिस्थिती गंभीर बनली

Swine Flu : महाराष्ट्रासह दिल्ली, कर्नाटकात 'स्वाईन फ्लू'च्या रुग्णांच्या संख्येत वाढ

नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांमध्ये स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र,

India China Border : भारत-चीन सीमा विवादावर टप्प्याटप्प्याने तोडग्याची तयारी

नवी दिल्ली : भारत आणि चीन यांच्यातील सहा दशकांहून जुना सीमा विवाद टप्प्याटप्प्याने सोडवण्याच्या दिशेने हालचाली

FSSAI New Rules : पॅकबंद पदार्थांच्या पाकिटांवर आता दिसणार 'धोक्याचा सिम्बॉल'

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या कठोर ताश्याऱ्यानंतर, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने पॅकबंद

Vishwa Hindu Parishad : दुर्गापूजा मंडपांमध्ये मांसाहारी पदार्थ टाळण्याचे विहिंपचे आवाहन

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजेच्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषदेकडून (विहिंप) पूजा आयोजकांसाठी