Asha Bhosle Music Academy : मुंबईत होणार ‘आशा भोसले संगीत अकॅडमी’

 मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; वांद्रे-अंधेरी दरम्यान जागेचा शोध घेण्यासाठी म्हाडाला आदेश


मुंबई : ज्येष्ठ पार्श्वगायिका पद्मविभूषण आशा भोसले यांच्या निधनानंतर, त्यांनी व्यक्त केलेली एक मोठी इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुंबईत राज्य सरकारच्या वतीने ‘आशा भोसले संगीत अकॅडमी’ स्थापन करण्यात येणार असून, मंत्रिमंडळाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत या प्रस्तावावर मोहोर उमटवण्यात आली. वांद्रे ते अंधेरी दरम्यान या अकॅडमीसाठी हक्काची जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले आहेत.



आशा भोसले यांनी आपल्या हयातीत राज्य सरकारकडे मुंबईत एका जागतिक दर्जाच्या संगीत अकॅडमीसाठी मागणी केली होती. वांद्रे आणि अंधेरी दरम्यानच्या परिसरात यासाठी जागा मिळावी, अशी त्यांची आग्रही विनंती होती. सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्री प्रताप सरनाईक यांनी आशाताईंच्या स्मारकाचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर भाष्य करताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, केवळ पारंपरिक स्मारक उभारण्यापेक्षा आशाताईंनी स्वतः दिलेला संगीत अकॅडमीचा प्रस्ताव पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.



या निर्णयानुसार, संगीत क्षेत्रातील नवोदित कलाकारांना प्रशिक्षण देण्यासाठी ही अकॅडमी मैलाचा दगड ठरणार आहे. या प्रकल्पासाठी योग्य जागेचा शोध घेण्याची जबाबदारी म्हाडाकडे सोपवण्यात आली आहे. वांद्रे ते अंधेरी या पट्ट्यात शासकीय भूखंड उपलब्ध करून देऊन तिथे अत्याधुनिक सुविधांनी सज्ज अशी ही वास्तू उभारली जाईल.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने