Ashok Kharat Case : शक्तिपीठ महामार्गात ‘इनसाइडर गेम’? भोंदूबाबा अशोक खरातवर जमीन खरेदीत घोटाळ्याचे आरोप

नाशिकचा वादग्रस्त भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) व त्याची पत्नी कल्पना खरात यांनी उत्तर सोलापूर तालुक्यात जमीन खरेदी केल्याची बाब उघडकीस आली आहे. प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाच्या मार्गात ही जमीन येत असल्याने अतिरिक्त मोबदला मिळवण्याच्या उद्देशाने ही जमीन खरेदी केल्याचा आरोप केला जात आहे.


उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण येथे खरातने सुमारे ४ हेक्टर ४८ आर (११ एकरहून अधिक) जमीन खरेदी केली आहे. शासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी असलेल्या संपर्कामुळे महामार्गाच्या रेखांकनाची माहिती आधीच मिळाल्याच्या आधारेच त्यांनी (Ashok Kharat) ही जमीन घेतल्याचा दावा स्थानिकांकडून केला जात आहे.



महामार्गासाठी जमीन संपादित होताना अधिक मोबदला मिळावा यासाठी खरातने दहा ते बारा फूट उंचीची आंब्याची झाडे आणून लावल्याची माहिती समोर आली आहे. तसेच भूसंपादन मोबदला प्रक्रियेत जास्त भरपाई मिळवून देणाऱ्या डाळिंब पिकाची नोंदही उताऱ्यावर करून घेतल्याचे सांगितले जात आहे.


या प्रकारामुळे रस्ते प्रकल्पातील भूसंपादन प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर घोटाळे होत असल्याची चर्चा सुरू झाली असून, या प्रकरणात संबंधितांना मदत करणारे अधिकारी कोण, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहे.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी