Eknath Shinde : आशाताईंनी स्वर समाधी घेतली! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहिली श्रद्धांजली

चंद्र-सूर्य आहेत तोवर आशाताईंची गाणी अजरामर राहतील


मुंबई : लता दीदी, आशा ताई आणि मंगेशकर कुटुंबाकडून सिने इंडस्ट्रीला मिळालेली गाणी ही अजरामर आहेत. हृदयविकाराचा झटका आला आणि शनिवारी तात्काळ आशा ताईंना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार घेत असताना रविवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मावळली.



उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आशा ताईंना श्वाहिली श्रद्धांजली


ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांनी संगीत क्षेत्रात हिमालया एवढं उत्तुंग काम करुन ठेवलंय, जे कुठल्याही फूटपट्टीने मोजता येणार नाही. आशाताई महाराष्ट्राच्या शान होत्या आणि मराठी अस्मितेच्या मानबिंदू होत्या. आशाताईंचे निधन नाही तर त्यांनी स्वर समाधी घेतली, अशा शब्दांत शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहिली.



उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आशाताईंनी मराठी आणि हिंदीच नाही तर तामिळ, मल्याळम, इंग्रजी, रशियन अशा जवळपास २० भाषांमधील गाणी गायली. सुख-दु:खात त्यांची गाणी ऐकायचो. खासकरुन दु:खाच्या प्रसंगी त्यांची गाणी आधार वाटतात. आजही त्यांनी गायलेली हजारो गाणी कालची ताजी गाणी असल्याचा भास होतो. जोपर्यंत चंद्र-सूर्य आहेत, तोपर्यंत आशाताईंची गाणी अजरामर राहतील आणि संगीत प्रेमींना आनंद देत राहतील, अशी भावना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली.



आशा ताईंना अनेक पुरस्कार मिळाले पण मुख्यमंत्री असताना त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्याचे संधी मला मिळाली, याबद्दल मी भाग्यवान समजतो, असे ते म्हणाले. आशाताईंनी लाडकी बहिण योजनेचे कौतुक केले होते. १५०० रुपयांचे मोल किती आहे हे त्यांनी जाहीरपणे सांगितले होते. त्यांच्या सुरुवातीच्या काळात ही योजना हवी होती, असेही आशाताई म्हणाल्या होत्या. कारण त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी गरिबीचे चटके सहन केले होते, अशी आठवण उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी बोलून दाखवली. या दु:खद प्रसंगातून सावरण्याचे त्यांच्या कुटुंबियांना बळ मिळो, आशाताईंना शिवसेना पक्षाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने