Gold and silver prices : इराण-अमेरिका तणाव वाढला; सोन्या-चांदीच्या दरात मोठी चढ-उतार

मुंबई : पाकिस्तानच्या इस्लामाबाद (Islamabad) येथे झालेली इराण (Iran) आणि अमेरिका (America) यांच्यातील शांतता चर्चा निष्फळ ठरल्याने जागतिक तणाव पुन्हा वाढला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी होर्मुज सामुद्रधुनीच्या नाकाबंदीचे आदेश दिल्याची चर्चा असून, इराणविरोधात आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घडामोडींचा परिणाम आता आर्थिक क्षेत्रावरही दिसून येत आहे.



सोन्याच्या दरात घसरण :


आठवड्याच्या सुरुवातीलाच भारतात सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. नवी दिल्ली (New Delhi) येथे २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,५२,९८० रुपये असून, मुंबईमध्ये (Mumbai) तो १,५२,८३० रुपये आहे. मात्र गेल्या आठवड्यात सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली होती.



चेन्नई (Chennai) येथे सोनं सर्वाधिक महाग असून २४ कॅरेटसाठी १,५४,१०० रुपये दर आहे. पुणे आणि बंगळुरू येथे दर मुंबईसारखाच आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डचा भाव प्रति औंस४,७७७.१७ डॉलर्सवर पोहोचला आहे.



चांदीच्या किमतीतही घसरण :


दरम्यान, चांदीच्या किमतीतही घसरण झाली असून प्रति किलो दर २,५९,९०० रुपयांवर आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा दर प्रति औंस ७५.९१ डॉलर्स आहे. गेल्या काही महिन्यांत मोठी वाढ झाल्यानंतर सध्या सोन्या-चांदीच्या दरात सतत चढ-उतार सुरू आहेत.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण