Pune Municipal Corporation : पुणे महापालिका क्षेत्रीय कार्यालय पुनर्रचनेचा सविस्तर खुलासा सादर करा

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश; सुनेत्रा पवार यांच्या पत्राची दखल, प्रभाग समित्यांच्या सत्तासंतुलनावरून पुणे पालिकेला विचारणा


मुंबई : पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांच्या पुनर्रचनेमुळे प्रभाग समित्यांमधील सत्तासंतुलन बिघडत असल्याच्या तक्रारीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या संदर्भात थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून राष्ट्रवादी काँग्रेसवर अन्याय होत असल्याचा आरोप केला होता. या पत्राची तातडीने दखल घेत, मुख्यमंत्र्यांनी पुणे महानगरपालिकेकडे या प्रकरणाचा सविस्तर खुलासा मागवला असून नगरविकास विभागाला वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.



पुणे महानगरपालिकेमध्ये सध्या १५ क्षेत्रीय कार्यालये कार्यरत असून, प्रशासनाने नुकतीच त्यांची नव्याने रचना केली आहे. मात्र, या पुनर्रचनेनंतर राजकीय गणिते बदलल्याचा दावा सुनेत्रा पवार यांनी आपल्या पत्रात केला आहे. विशेषतः वडगाव शेरी आणि येरवडा या भागात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अधिक संख्येने निवडून आले असतानाही, नव्या रचनेमुळे संबंधित प्रभाग समित्यांचे अध्यक्षपद भाजपच्या पारड्यात गेल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. हा बदल अन्यायकारक असून यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकशाही समतोल बिघडत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली होती.



मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेत, महापालिका आयुक्तांनी या रचनेचा आधार काय होता आणि तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे सत्तासंतुलनात तफावत निर्माण झाली आहे का, याचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल शासनाला सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. नगरविकास विभागालाही या संदर्भात लक्ष घालण्यास सांगण्यात आले असून, महापालिकेकडून येणाऱ्या अहवालानंतर शासन स्तरावर या पुनर्रचनेत काही बदल केले जाणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून