Ramdas Athawale : 'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती, जोडते दलित सवर्णांची नाती'

बॉर्डरलेस बाबासाहेब आंबेडकर प्रदर्शनाचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते उद्घाटन


मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती, जोडते दलित सवर्णांची नाती अशी काव्यमय सुरुवात करुन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बॉर्डरलेस बाबासाहेब आंबेडकर या प्रदर्शनाचे उद्घाटन केले. मुंबईत रविंद्र नाटय मंदिर येथे बॉर्डरलेस बाबासाहेब प्रदर्शनात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोलंबिया विद्यापीठ अमेरिका, लंडन, महु मध्यप्रदेश, आंबेटेंबे मुरबाड, आंबडवे मंडनगड, सोलापुर, पुणे, कोल्हापुर, हैद्राबाद, आग्रा, नेपाळ आदि ऐतिहासिक स्थळावरील मातीचे संकलन करुन या प्रदर्शनात ठेवण्यात आलेले आहे. बॉर्डरलेस बाबासाहेब या प्रदर्शनाचे प्रमुख डॉ. राजेंद्र जाधव यांनी या सर्व स्थळांवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मातीचे संकलन करुन या प्रदर्शनात प्रदर्शित केलेले आहे. या प्रदर्शनाचे रामदास आठवले यांनी कौतुक केले.


बॉर्डरलेस बाबासाहेब या प्रदर्शनात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रांचेही  प्रदर्शन करण्यात आले आहे. ही तैलचित्रे आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिव्यांग चित्रकार नितीन खरात यांनी काढलेले आहेत. या प्रदर्शनात १५३ देशांचे राष्ट्रीय ध्वजही प्रदर्शित करण्यात आलेले आहेत. शिल्पकार आतिष पालवनकर यांनी साकारलेली शाई पेनाची निप पाहण्यासारखी आहे.


महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कर्तृत्व आणि विचार यांना कोणत्याही देशाच्या सीमा (बॉर्डर) रोखू शकत नाहीत. त्यामुळे या प्रदर्शनाला बॉर्डरलेस बाबासाहेब हे नाव समर्पक असल्याचे कौतुक केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सिध्दार्थ कासारे, जिल्हा अध्यक्ष संजय पवार, संयोजक राजेंद्र जाधव, प्रा. हेमंत सामंत, पत्रकार कुणाल कांबळे, सोनबा येलवे यांचे नातु सदानंद येलवे, विजय सुराडकर, डॉ. वैभव देवगीरकर आदि अनेक मान्यंवर यावेळी उपस्थित होते.
Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण