Ashok Kharat Case : अशोक खरातला पुन्हा ५ दिवसांची पोलिस कोठडी

नाशिक : भोंदूगिरी व महिलांच्या शोषणाच्या आरोपांमध्ये अडकलेल्या अशोक खरातच्या अडचणी आणखी वाढल्या असून, न्यायालयाने त्याला पुन्हा १८ एप्रिलपर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तिसऱ्या गुन्ह्यातील कोठडी संपल्यानंतर त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान सुरुवातीला तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या, मात्र त्या दूर झाल्यानंतर प्रक्रिया पुन्हा सुरू झाली.


सरकारी वकील अॅड. शैलेंद्र बागडे यांनी आरोपी स्वतःला देवाचा अवतार सांगून महिलांना प्रभावाखाली आणत असल्याचा आरोप केला. महिलांना दिल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये गुंगी आणणारे घटक मिसळले जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. या माध्यमातून महिलांचे मानसिक व शारीरिक शोषण केल्याचे त्यांनी नमूद केले. तपासासाठी वापरलेले पदार्थ, तसेच भोंदूगिरीसाठी वापरलेल्या वस्तूंचा शोध घेणे आवश्यक असल्याने अधिक कोठडीची मागणी सरकारी पक्षाने केली. बचाव पक्षाने याला विरोध करत तपास पूर्ण झाल्याचा दावा केला. मात्र न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तिवाद मान्य केला.


दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने पोलिसांचा युक्तिवाद ग्राह्य धरत खरातला पाच दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली. या कालावधीत तपास यंत्रणा आरोपीच्या कार्यपद्धतीबाबत अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. आतापर्यंत अनेक महिलांनी खरातविरोधात तक्रारी दाखल केल्या असून, पुढील चौकशीत आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

पुण्यात भरधाव कारचा थरार! एमआयटी कॉलेज रोडवर 3 ते 4 दुचाकींना धडक; 24 वर्षीय चालक पोलिसांच्या ताब्यात

पुणे : पुण्यातील कोथरूड परिसरात भरधाव कारने अनेक दुचाकींना धडक दिल्याची घटना समोर आली आहे. एमआयटी

Pune Weather : उकाड्यापाठोपाठ पुण्यात पुन्हा मुसळधार पावसाची एन्ट्री; हवामान विभागाकडून 'यलो अलर्ट' जारी

पुणे : गेल्या काही दिवसांपासून वाढलेली ऑक्टोबर हीट आणि प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांसाठी एक

नाचणीची भाकरी, भाजी अन् बांधावरील गप्पा; ग्रामस्थांशी संवाद साधत पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले जलसंधारण चळवळीला बळ

सिंधुदुर्ग : दुष्काळी परिस्थितीचा सामना करताना पाण्याचा प्रत्येक थेंब अडविणे, जमिनीत जिरविणे आणि उपलब्ध

AstraZeneca Pharma India : जागतिक बाजारपेठेत भारतीय औषध उद्योगांची प्रभावी कामगिरी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : “अमेरिका आणि युरोपसारख्या नियंत्रित बाजारपेठांमध्ये भारतीय औषधे, विशेषतः जेनेरिक औषधे, प्रभावी कामगिरी

राज्यातील सर्व शाळांमध्ये राज्य सरकार राबवणार विशेष स्वच्छता मोहीम, साफसफाई आणि किरकोळ दुरुस्तीवर देण्यात येणार भर

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये विशेष स्वच्छता मोहिम राबवण्यात येणार आहे. स्वच्छता

Jalna Healthcare Project : जालन्यात कर्करोग, हृदयरोगांसह गंभीर आजारांवर उपचार; 3 हेक्टर जागेला मंजुरी

मुंबई : मराठवाड्यातील गोरगरीब रुग्णांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जालना येथील