Ashok Kharat, Rupali Chakankar : खरात प्रकरणात माझ्या बदनामीचा डाव - रुपाली चाकणकर

मुंबई : "गेल्या २८ दिवसांपासून माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर होणारे सर्व आरोप हे केवळ हेतूपुरस्सर आणि बदनामी करण्यासाठी केले जात आहेत. केवळ तर्कवितर्क आणि रंजक अफवांच्या आधारावर बदनामी करण्याचा हा नवा आणि चुकीचा पायंडा पाडला जात आहे", अशा शब्दांत राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आपली भूमिका मांडली आहे. खरात प्रकरणात आपला कोणताही आर्थिक किंवा जमीन व्यवहार नसल्याचा पुनरुच्चार करतानाच, या प्रकरणातील 'सत्य' लवकरच समोर येईल, असा दावाही त्यांनी केला.



रूपाली चाकणकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली सविस्तर बाजू मांडली आहे. राजकीय क्षेत्रात आरोप-प्रत्यारोप होत असतात, मात्र सध्याच्या प्रकरणात आरोप करणाऱ्यांनी कोणतेही पुरावे दिलेले नाहीत. निनावी पत्राचा आधार घेऊन केवळ कपोलकल्पित कथा रंगवल्या जात असल्याचा दावा चाकणकर यांनी केला.



पोलीस प्रशासनाला प्राप्त झालेले एक निनावी पत्र माध्यमांपर्यंत पोहोचवून दिवसभर चर्चासत्रे घडवून आणली गेली. या बदनामीच्या कुटील डावामागे नेमके कोणाचे ‘सौजन्य’ आहे, हे समोर आले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनीही ज्या पत्रावर नाव आणि पत्ता नाही, अशा पत्राला कायदेशीरदृष्ट्या महत्त्व देता येत नाही, असे स्पष्ट केले असतानाही हे पत्र कोठून आले आणि कोणी लिहिले याची चौकशी होणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.



खरातच्या दुष्कृत्यात दुरान्वयेही संबंध नाही


गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या एकतर्फी बातम्यांवर प्रतिक्रिया का दिली नाही, याचे कारणही चाकणकर यांनी स्पष्ट केले. "एसआयटी आणि तपास यंत्रणांना निष्पक्षपातीपणे चौकशी करता यावी, हाच माझा हेतू होता. खरात प्रकरणात कोणत्याही दुष्कृत्यात आमचा दुरान्वयेही संबंध नाही," असे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने